Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

भारतात आश्रयाला आलेली 800 हिंदू कुटुंबे पाकिस्तानात परत गेली

भारतात आश्रयाला आलेली 800 हिंदू कुटुंबे पाकिस्तानात परत गेली


भारतात आश्रयाला असलेले पाकिस्तानातील 800 हिंदू पुन्हा पाकिस्तानात परतल्याचा दावा करत मोदी सरकारसाठी ही शरमेची बाब असल्याचे भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी म्हटले आहे. स्वामींनी यासंदर्भात ट्विट केले असून केंद्रावर टीकास्त्र सोडले आहे. सुब्रमण्यम स्वामींनी म्हटले की, मानवाधिकारांचे उल्लंघन झालेले पाकिस्तानातील 800 हिंदू पीडित जे भारताच्या आश्रयाला आले होते. या लोकांना भारतीय नागरिकत्व मिळेल अशी आशा होती. पण, मोदी सरकारने सीएए कायद्यावर आद्याप कार्यवाही सुरु न केल्याने निराश झालेले हे लोक पुन्हा पाकिस्तानात परतले आहेत, ही बाब केंद्रातील भाजप सरकारसाठी शरमेची बाब आहे.

सन 2011 मध्ये काँग्रेसच्या नेतृत्वातील युपीए सरकारने पाकिस्तानात राहणाऱ्या ज्या हिंदू कुटुंबियांना अत्याचाराला सामोर जावे लागले होते, त्यांना दीर्घकालिन व्हिसा म्हणजेच एलटीव्ही देण्याचा निर्णय घेतला होता. यानंतर शेकडो हिंदू आणि शीख धर्मीय लोक भारतात आले होते. पण, सुमारे दहा वर्षांनंतरही भारताची नागरिकता मिळू न शकल्यानं 80 हिंदू कुटुंबांना नाईलाजाने पाकिस्तानात परतावे लागले आहे. 

या कुटुंबांनी नागरिकता मिळावी यासाठी सरकारी कार्यालयांमध्ये अनेक चकरा मारल्या, पण त्यांचे काम झाले नाही. पाकिस्तानी अल्पसंख्यांक प्रवाशांच्या हक्कांसाठी आवाज उठवणाऱ्या भारतातील सीमांत लोकसंगठन या संघटनेने हा दावा केला आहे. यावरुन सुब्रमण्यम स्वामी यांनी केंद्राला सुनावले आहे. दरम्यान, भारतात नागरिकत्व संशोधन कायदा अर्थात सीएए लोकसभेत सन 2019 मध्ये मंजूर करण्यात आला. या कायद्यानुसार, पाकिस्तान, अफगाणिस्तान, बांगलादेश आदी देशांमधील पीडित अल्पसंख्यांक असलेल्या हिंदू, शीख, बौद्ध, जैन, पारसी आणि ख्रिश्चन धर्मिय जे डिसेंबर 2014 पूर्वी भारतात आले आहेत. त्यांना भारताची नागरिकता देण्यात येणार आहे. या कायद्यावरुन देशभरात मोठा क्षोभ झाला होता, दरम्यान अद्याप या कायद्याची अंमलबजावणी झालेली नाही.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.