Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

अजितदादांचा दम, आता तिकीट देताना बघतोच...

 अजितदादांचा दम, आता तिकीट देताना बघतोच...


सासवड : सध्या जिल्हा परिषदेच्या विषय समित्या सदस्यपद बरखास्त झाले आहेत. यामुळे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांना काम सांगावे लागत आहे. पूर्वी ते म्हणायचे, की पदाधिकाऱ्यांना सांगा.

मी काम करतो. पण, मीच सदस्यांना निवडून आणायचे आणि पुन्हा काम कर बाबा…असे म्हणायचे. त्यामुळे आता तिकीट देताना बघतोच, असा सज्जड दम कार्यकर्तांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भरला.

खानवडी (ता. पुरंदर) येथे जिल्हा परिषद व फियाट इंडिया ऑटोमोबाइल प्रायव्हेट लिमिटेड रांजणगाव यांच्या सीएसआर निधीतून ज्योती सावित्री इंटरनॅशनल स्कूल शाळेच्या इमारतीचे भूमिपूजन पवार यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी खासदार सुप्रिया सुळे, पुरंदर-हवेलीचे आमदर संजय जगताप, जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष प्रा. दिगंबर दुर्गाडे, माजी आमदार अशोक टेकवडे उपस्थित होते.

पवार म्हणाले की, खानवडी येथील ज्योती सावित्री इंटरनॅशनल स्कूलमध्ये फक्‍त मुलींना शिक्षण दिले जाईल. यासाठी ग्रामपंचायतीने देखील मदत करणे गरजेचे आहे. सध्या ग्रामपंचायतीने 12 एकर जमीन शिक्षण संस्थेसाठी दिली असली तरी भविष्यात गरज पडली तर अधिक जमीन द्यावी. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आशिष जराड व बाळासाहेब फडतरे यांनी तर सरपंच स्वप्नली होले यांनी आभार मानले.

शेतकऱ्यांनी बुलेट ट्रेनला विरोध करू नये

मुंबई ते हैदराबाद अशी बुलेट ट्रेन सध्या होत आहे. ही ट्रेन पुणे, सोलापूर या जिल्ह्यांमधून जात आहे यासाठीचा सर्व्हेचे काम सुरू आहे. शेतकऱ्यांनी लगेच या कामाला विरोध करू नये, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.

“त्यांच्यामुळे’ काकड आरत्याही बंद झाल्या

“काही लोकांना सध्या राज्यामध्ये दंगली घडवायच्या आहेत. भोंगे काढण्याच्या प्रकरणामुळे राज्यातील प्रमुख देवस्थानच्या काकड आरत्या बंद झाल्या आहेत. हे यांच्या का लक्षात येत नाही. राज्यात जातीय सलोखा ठेवणे फार महत्त्वाचे आहे आणि तो ठेवला जाईल, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.