Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

अमित शहांच्या भेटीत ठरलं, सौरव गांगुलीची पत्नी होणार राज्यसभा खासदार!

अमित शहांच्या भेटीत ठरलं, सौरव गांगुलीची पत्नी होणार राज्यसभा खासदार!


मुंबई, 10 मे : बीसीसीआय अध्यक्ष आणि टीम इंडियाचा माजी कॅप्टन सौरव गांगुलीची पत्नी डोना गांगुली राज्यसभा खासदार होण्याची शक्यता आहे.

डोना यांची राष्ट्रपतींकडून राज्यसभेवर नियुक्ती होणार अशी चर्चा आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा  यांनी काही दिवसांपूर्वी गांगुलीच्या घरी भोजन केले होते. त्यानंतर ही चर्चा सुरू झाली आहे. डोना प्रसिद्ध ओडिशी नृत्यांगना आहे.

तसंच त्यांनी जगभर क्लास्किल डान्सचे कार्यक्रम केले आहेत. भाजपाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष दिलीप घोष यांनीही डोना गांगुली यांच्या नियुक्तीचे संकेत दिले आहेत. दिलीप घोष यांनी पत्रकारांना सांगितलं की, 'राष्ट्रपती वेगवेगळ्या क्षेत्रातील प्रसिद्ध व्यक्तींची राज्यसभेत नियुक्ती करतात. त्यांनी पश्चिम बंगालमधील कोणत्याही व्यक्तीची नियुक्ती केली तर आम्हाला आनंद होईल.

त्याचबरोबर डोना गांगुलीसारख्या व्यक्तीची राष्ट्रपतींनी नियुक्ती केली तर आम्हाला आणखी आनंद होईल,' असे घोष यांनी सांगितले. भारतीय जनता पक्षाचे बंगाल प्रदेश प्रमुख सुकांत मजूमदार यांनी या विषयावर काहीही बोलण्यास नकार दिला आहे. मजमूदार यांनी सांगितले की, 'हा पक्षाचा अंतर्गत विषय आहे. याबाबत मीडियाशी चर्चा करणे योग्य नाही.

केंद्रीय नेतृत्त्वच या विषयावर शेवटचा निर्णय घेत असते. अर्थात गांगुली यांची राज्यसभेवर नियुक्ती झाली तर मला नक्कीच आनंद होईल,' असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. पश्चिम बंगालमधील राज्यसभा सदस्य रूपा गांगुली आणि माजी पत्रकार स्वप्न दासगुप्ता यांचा कार्यकाळ समाप्त होणार आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी नुकताच तीन दिवसांचा बंगाल दौरा केला.

या दौऱ्याच्या दरम्यान 6 मे रोजी रात्री त्यांनी कोलकातामधील सौरव गांगुलीच्या घरी भोजन केले. राहुल द्रविडची राजकारणात एन्ट्री? कर्नाटक निवडणुकीआधी सुरू करणार नवी इनिंग भाजपाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सौरव गांगुलीच्या घरी अमित शाहा, बंगाल भाजपा अध्यश्र सुकांत मजूमदार, पश्चिम बंगाल विधानसभेतील विरोधी पक्षनेते सुवेंदू अधिकारी उपस्थित होते. त्याचवेळी डोना गांगुली यांची राष्ट्रपती यांच्याकडून राज्यसभेवर नियुक्ती होण्याबाबत चर्चा झाली. त्याच दिवशी डोना गांगुली यांचा व्हिक्टोरिया मेमोरियलमध्ये नृत्य कार्यक्रम होता. त्या कार्यक्रमाला अमित शहा देखील उपस्थित होते.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.