Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सांगली येथे कामगार दिनानिमित्त भव्य कामगार मेळाव्याचे आयोजन

 सांगली येथे कामगार दिनानिमित्त भव्य कामगार मेळाव्याचे आयोजन


1 मे हा आंतरराष्ट्रीय कामगार दिन व महाराष्ट्र राज्याचा स्थापना दिवस ! आमच्या कामगार संघटनानी हा दिवस केन्द्र सरकारने मंजूर केलेल्या चार लेबर काड (श्रम संहिता) रद्द करण्याची मागणी बुलंद करणे व महाराष्ट्र सरकारने याबाबतची नियमावली रद्द करण्यासाठी व्यापक विरोध संघटीत करणार आहोत. तीन कृषि कायदे नवीन मंजूर करून घेत असतानाच संसदे मध्ये केन्द्र सरकार ने एकूण 29 कामगार कायदे रद्द करण्याचा प्रस्ताव आवाजी मतदानाने मंजूर करून घेतला व 4 कामगार संहिता (लेबर कोड) संसदेत कोणतीही चर्चा न करता आवाजी मतदानाने मंजूर करण्याचे पाप केन्द्र सरकारने केले आहे.

कृषी कायदे उतर प्रदेश निवडणुकीच्या आधी रद्द केले मात्र किसान व कामगार 15 महिने एकत्रित लढले. नुकतेच दोन दिवसांचा देशव्यापी संप होऊन 4 कामगार संहिता (लेबर कोड) रद्द करा ही मागणी केली होती.

केन्द्र सरकार कॉरपोरेट भांडवलाचे हितसंबंध जपण्यास कटिबध्द असल्याने चार लेबर केाड रद्द होई पर्यंत आंदोलन अनेक पध्दतीने करणे आवश्यक आहे.

केन्द्र सरकार 1 जून 2022 पासून हे चार लेबर काड अंमलात आणणार आहे . हे चार लेबर कोड व महाराष्ट्र राज्य सरकारची नियमावली अंमलात आल्यास लहान व मध्यम उददयोग आणि कामगारांचे अस्तित्वच नष्ट होणार असून आर्थिक, सामाजिक जीवनावर घातक परिणाम होणार आहेत. याविरोधात महाराष्ट्र देशांतील कामगारांमध्ये प्रचंड असंतोष आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.