Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

राज्यसेवा परीक्षेत राज्यात पहिला आलेले प्रमोद चौगुले यांनी सांगली महापालिकेच्या वि स खांडेकर अभ्यासिकेस दिली भेट

राज्यसेवा परीक्षेत राज्यात पहिला आलेले प्रमोद चौगुले यांनी सांगली महापालिकेच्या वि स खांडेकर अभ्यासिकेस दिली भेट


राज्यसेवा परीक्षेत राज्यात पहिला आलेले प्रमोद चौगुले यांनी सांगली महापालिकेच्या वि स खांडेकर अभ्यासिकेस दिली भेट : विद्यार्थ्यांशी साधला संवाद: जुने वाचनालय आणि आताच्या आधुनिक वाचनालयाचे केले कौतुक

सांगली : राज्यसेवा परीक्षेत राज्यात पहिला आलेले प्रमोद चौगुले यांनी महापालिकेच्या वि स खांडेकर वाचनालयाला भेट दिली. यावेळी चौगुले यांनी वाचनालयात अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांना मार्गदर्शन केले. यावेळी मनपा आयुक्त नितीन कापडणीस यांनी अत्याधुनिक पद्धतीने तयार केलेल्या अभ्यासिकेचे कौतुकही चौगुले यांनी करीत आपल्या जुन्या आठवणींना उजाळा देत जुन्या काळातील वाचनालय आणि आताचे आधुनिक पद्धतीने तयार केलेलं वाचनालय नक्कीच सर्वसामान्य गोरगरीब विद्यार्थ्यांना फायदेशीर ठरेल असा विश्वाससुद्धा प्रमोद चौगुले यांनी व्यक्त केला. यावेळी उपायुक्त राहुल रोकडे यांनी प्रमोद चौगुले यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार केला. यावेळी बोलताना प्रमोद चौगुले यांनी वि स खांडेकर वाचनालयात अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांशी संवाद साधत 

अभ्यासात सातत्य ठेवा आपल्याला यश हमखास मिळेल तसेच कष्ट मेहनत आणि जिद्द कायम ठेवा आणि आपले लक्ष आपल्या ध्येयाकडे राहूदे असे आवाहन केले. यावेळी दिगंबर साळुंखे, वि.स. खांडेकर वाचनालयाचे राहुल मुळीक, सुनीता धाइंजे, शंकर भंडारी आणि उपस्थित होते.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.