Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

ग्रामपंचायतीतील रिक्त पदांच्या पोटनिवडणुकीसाठी कार्यक्रम जाहीर आदर्श आचार संहितेचे काटेकोरपणे पालन करा - जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी

ग्रामपंचायतीतील रिक्त पदांच्या पोटनिवडणुकीसाठी कार्यक्रम जाहीर आदर्श आचार संहितेचे काटेकोरपणे पालन करा - जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी


सांगली, दि. 2, :  राज्य निवडणूक आयोगाने ग्रामपंचायतीतील रिक्त झालेल्या पदांच्या पोटनिवडणुकीसाठी कार्यक्रम जाहीर केला असून यानुसार सांगली जिल्ह्यातील 37 ग्रामपंचायतींची 45  रिक्त (ना.मा.प्र. पदे वगळून) पदांकरीता निवडणूकीचा कार्यक्रम घोषित केला आहे. निवडणुका असलेल्या ग्रामपंचायतीमध्ये निवडणूक कार्यक्रम जाहीर केल्यापासून निवडणूकीचा निकाल जाहीर होईपर्यंत आचारसंहिता लागू राहील.  तरी आदर्श आचार संहितेचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी केले आहे.

या क्षेत्रातील मतदारावर विपरीत प्रभाव टाकणारी कोणतीही कृती, घोषणा मंत्री, खासदार, आमदार व संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थेतील पदाधिकारी यांना आचारसंहिता कालावधीत कुठेही करता येणार नाही असे कार्यक्रमामध्ये नमूद केले आहे. ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूकीकरिता राज्य निवडणूक आयोगाचे आचारसंहितेबाबतचे  दि. 14 ऑक्टोबर 2016 चे एकत्रित आदेश, दिनांक 6 सप्टेंबर 2017 चे अतिरिक्त आदेश व दि. 17 डिसेंबर 2020 च्या पत्रामधील सूचनेनुसार आदर्श आचारसंहितेचे काटकोरपणे अंमलबजावणी करून आदर्श आचार संहितेचा भंग होणार नाही असे नमूद केले आहे. 

ग्रामपंचायतीतील रिक्त झालेल्या पदांच्या पोटनिवडणूकांसाठी पारंपारिक पध्दतीने राबविण्यात यावयाचा निवडणूक कार्यक्रम पुढीलप्रमाणे. तहसिलदार यांनी निवडणुकीची नोटीस प्रसिध्द करण्याचा दिनांक - 5 मे 2022 (गुरूवार), नामनिर्देशनपत्रे मागविण्याचा व सादर करण्याचा दिनांक व वेळ - दि. 13 मे 2022 (शुक्रवार) ते दि. 20 मे 2022 (शुक्रवार) वेळ सकाळी 11 ते दुपारी 3 (दि. 14 मे 2022 शनिवार, दि. 15 मे 2022 चा रविवार व दि. 16 मे 2022 ची सार्वजनकि सुट्टी वगळून), नामनिर्देशनपत्र छाननी करण्याचा दिनांक व वेळ - दि. 23 मे 2022 (सोमवार) वेळ सकाळी 11 वाजल्यापासून छाननी संपेपर्यंत, नामनिर्देशनपत्र मागे घेण्याचा अंतिम दिनांक व वेळ - दि. 25 मे 2022 (बुधवार) दुपारी 3 वाजेपर्यंत, निवडणूक चिन्ह नेमून देण्याचा तसेच अंतिमरित्या निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी प्रसिध्द करण्याचा दिनांक व वेळ - दि. 25 मे 2022 (बुधवार) दुपारी 3 वाजल्यानंतर, आवश्यक असल्यास मतदानाचा दिनांक - दि. 5 जून 2022 (रविवार) सकाळी 7.30 वाजल्यापासून ते सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत. मतमोजणी व निकाल घोषित करण्याचा दिनांक (मतमोजणीचे ठिकाण व वेळ जिल्हाधिकाऱ्यांच्या मान्यतेने तहसिलदार निश्चित करतील त्यानुसार राहील) - दि. 6 जून 2022 (सोमवार), जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत निवडणुकीच्या निकालाची अधिसूचना प्रसिध्द करण्याचा अंतिम दिनांक - दि. 9 जून 2022 (गुरूवार) पर्यंत.

तालुकानिहाय रिक्त  पदांकरीता पोटनिवडणूक होत असलेल्या ग्रामपंचायती व कंसात सदस्याचा रिक्त पदाचा प्रभाग व प्रवर्ग पुढीलप्रमाणे.  पलूस - हजारवाडी (१ अ. जमाती महिला), पुणदी (वा.) (2 अ. जमाती महिला), तासगाव - वज्रचौंडे (३ सर्वसाधारण स्त्री), उपळावी (४ सर्वसाधारण स्त्री), खानापूर - देवनगर (३ सर्वसाधारण स्त्री), भूड (1 अनु. जाती), सांगोले (२ सर्वसाधारण स्त्री), धोंडेवाडी (१ सर्वसाधारण), कवठेमहांकाळ - हिंगणगाव (३ सर्वसाधारण स्त्री), इरळी (३ सर्वसाधारण), अग्रणधुळगाव (१ अनु. जाती), वाळवा - डोंगरवाडी (१ अनु. जाती व 3 सर्वसाधारण स्त्री), नायकलवाडी (२ सर्वसाधारण स्त्री), फार्णेवाडी बी (१ सर्वसाधारण स्त्री व 2 सर्वसाधारण), कारंदवाडी (३ अनु. जमाती), कोरेगांव (५ सर्वसाधारण), आटपाडी - जांभूळणी (१ सर्वसाधारण स्त्री), जत - अंकलगी (१ अनु. जमाती), बोर्गी खु. (३ सर्वसाधारण पुरूष), गुलगुंजनाळ (२ सर्वसाधारण पुरूष), मोटेवाडी (२ सर्वसाधारण स्त्री), मिरज - कांचनपूर (२ सर्वसाधारण स्त्री व 3 अनु. जाती स्त्री), काकडवाडी (३ सर्वसाधारण पुरूष), रसूलवाडी (१ सर्वसाधारण स्त्री), सांबरवाडी (३ सर्वसाधारण पुरूष), आरग (१ अनु. जाती पुरूष), शिराळा - बेलेवाडी (२ सर्वसाधारण स्त्री व ३ सर्वसाधारण), खराळे (3 सर्वसाधारण  व 3 सर्वसाधारण स्त्री), शिवरवाडी (२ अनु. जाती), कदमवाडी (२ सर्वसाधारण स्त्री व ३ सर्वसाधारण), खुंदलापूर (३ सर्वसाधारण स्त्री), वाकाईवाडी ( १ सर्वसाधारण स्त्री व ३ सर्वसाधारण), मोरेवाडी (२ सर्वसाधारण स्त्री),  शिंदेवाडी (१ सर्वसाधारण व २ सर्वसाधारण स्त्री), मराठेवाडी (१ सर्वसाधारण) खेड (३ अनु. जाती स्त्री) कोंडाईवाडी (३ अनु. जाती).  


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.