Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

एक्साईजमधील घोटाळ्यांची उच्च स्तरीय चौकशीची गरज

एक्साईजमधील घोटाळ्यांची उच्च स्तरीय चौकशीची गरजइस्लामपूरसह अनेक प्रकरणात सांगलीतील अधिकाऱ्यांचा चालढकलपणा

सांगली: इस्लामपूर येथील गोवा बनावट दारू प्रकरणासह मयतावर गुन्हा, गोवा बनावटीच्या दारूची तस्करी, लाचखोरपणा, भ्रष्टाचार अशा अनेक प्रकरणात बदनाम झालेल्या सांगली एक्साईजमधील घोटाळ्यांची आता उच्च स्तरीय चौकशी होण्याची गरज आहे. केवळ इस्लामपूर प्रकरणातील सूत्रधार त्या सदुनिची जरी खातेनिहाय तसेच त्याच्या भरतीची चौकशी केल्यास सांगली एक्साईजच्या अनेक भानगडी बाहेर पडण्याच्या शक्यता आहेत. त्यामुळे मुंबईतील वरीष्ठ अधिकाऱ्यांनी याची दखल घेत तातडीने संबंधितांना निलंबित करून चौकशी करण्याची गरज आहे.  

इस्लामपूर प्रकरणातील मुख्य सूत्रधार असलेला तो सदुनि खात्यात २०१२ मध्ये भऱती झाला. पात्रता नसताना त्याची भरती करण्यात आली. त्यावेळच्या भरती प्रक्रियेसह त्यानंतर अनेक प्रकरणांत सांगलीच्या एक्साईजची बदनामी झाली आहे. मयत व्यक्तीवर गुन्हा, गोवा बनावटीच्या दारूची तस्करी, लाचखोरपणा, भ्रष्टाचार याबाबत अनेक सामाजिक कायर्कत्यार्नी वरीष्ठ पातळीवर तक्रारी केल्या आहेत. मात्र त्यातील काही प्रकरणात जुजबी कारवाई करण्यात आली. तर काही प्रकरणांची अजूनही चौकशी सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे. 

तडफदार, कायर्तत्पर समजले जाणारे अजितदादा पवार यांच्याकडे हे खाते आहे. आता तक्रारदार थेट त्यांनाच भेटून सांगलीतील एक्साईजची पोलखोल करणार असल्याचे समजते. सांगली एक्साईजची इतकी बदनामी होऊनही विविध प्रकरणांतील दोषींवर कोणतीच मोठी कारवाई न झाल्याने आश्चयर् व्यक्त केले जात आहे. त्यामुळे आता या खात्याचे मंत्री, प्रधान सचिव, आयुक्त यांनीच याप्रकरणांमध्ये लक्ष घालून संबंधितांना निलंबित करून त्यांची उच्च स्तरीय चौकशी करण्याची गरज आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.