Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

इस्लामपूर प्रकरणातील तो बार चालक कारवाई कक्षेच्या बाहेरच

इस्लामपूर प्रकरणातील तो बार चालक कारवाई कक्षेच्या बाहेरच


गोवा बनावटीची दारू मागविणाऱ्यावर कारवाई का नाही?

सांगली : इस्लामपूर येथील गोवा बनावट दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार असलेल्या त्या सदुनिने येलूर येथील एका बार चालकाला हाताशी धरून गोवा बनावटीची दारू मागवल्याचे संशयिताने सांगितले आहे. ही दारू मागवण्यापूवीर्ही त्याच्या बारमध्ये गोवा बनावटीची दारू ठेवल्याप्रकरणी त्याच्यावर कारवाईही करण्यात आली होती. मात्र चक्क कंटेनर मागवणाऱ्या येलूरच्या बार चालकावर का कारवाई केली जात नाही असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.  

इस्लामपूर येथे गेल्या महिन्यात गोवा बनावटीच्या दारूचा कंटेनर पकडण्यात आला होता. येलूर फाट्यावरील एका पेट्रोल पंपासमोर ही कारवाई करण्यात आली होती. या प्रकरणातील एका संशयिताच्या खात्यावर संबंधित बार चालकाने एक लाख रूपयांहून अधिक पैसे भरले होते. दारू आणण्याआधी सुमारे महिनाभर आधीच हे पैसे भरण्यात आले होते. पैसे भरल्यानंतर तो बार चालक आणि या प्रकरणाचा सूत्रधार असलेला सदुनि हे संशयितावर सातत्याने गोव्याला जाऊन दारू आणण्यासाठी दबाव टाकत होते. त्यांच्या दबावाला बळी पडून संशयिताने गोव्याहून कंटेनरभरून दारू मागवली. 

त्यानंतर सदुनिने फिल्मी स्टाईलने येलूर फाट्यावर कारवाई केली. त्याने कारवाई केल्यानंतर सदुनिच्या लोकांसह त्या बार चालकाच्या लोकांनी त्या संशयिताला एका हॅटेलच्या पिछाडीस नेऊन त्याला बेदम मारहाण केली. याप्रकरणात संशयिताचा जबाबही नोंदवण्यात आला आहे. सदुनिचीही चौकशी करण्यात आली आहे. त्या सदुनिच्या सांगण्यावरून गोवा बनावटीची दारू आणण्यास भाग पाडणाऱ्या त्या बार चालकावर अद्याप कोणतीही कारवाई न झाल्याने आश्चयर् व्यक्त केले जात आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.