Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

प्रतिबंधात्मक कारवाईत जिल्हा पोलिस दल आघाडीवर जिल्हा पोलिस प्रमुख दीक्षित गेडाम यांच्या तत्परतेमुळे गुन्हेगारीत घट

प्रतिबंधात्मक कारवाईत जिल्हा पोलिस दल आघाडीवर जिल्हा पोलिस प्रमुख दीक्षित गेडाम यांच्या तत्परतेमुळे गुन्हेगारीत घट



सांगली : जिल्हा पोलिस प्रमुख दीक्षित गेडाम यांनी कार्यभार घेतल्यानंतर जिल्ह्यातील गुन्हेगारीत कमालीची घट झाल्याचे दिसून येत आहे. त्यांनी मोका, हद्दपारी, स्थानबद्धता यासह प्रतिबंधात्मक कारवाया वाढवल्याने गुन्हेगारी कृत्यांना चांगलाच आळा बसल्याचे दिसून येत आहे. सन 2020 च्या तुलनेत प्रतिबंधात्मक कारवाईची प्रभावी अंमलबजावणी झाल्याने गुन्हेगार जिल्ह्यातून हद्दपार झाल्याचे चित्र आहे.  

सन 2020 मध्ये मुंबई पोलिस कायदा कलम 55, 56, 57 नुसार 68 टोळ्यांविरोधात तडीपारीचे प्रस्ताव पाठवण्यात आले होते. त्यातील 26 प्रस्तावांना मंजुरी मिळाली. तर सन 2021 मध्ये 106 प्रस्ताव पाठवण्यात आले. त्यातील 20 प्रस्तावांनाच मंजुरी मिळाली. मात्र सन 2020 च्या तुलनेत 2021 मध्ये सर्वाधिक प्रस्ताव पाठवण्यात आले. 2021 मध्ये 7 टोळ्यांमधील 39 गुन्हेगारांना जिल्ह्यातून एक वर्षासाठी तडीपार करण्यात आले आहे. तर एमपीडीए अ‍ॅक्टनुसार 5 गुन्हेगारांना 1 वर्षासाठी कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले आहे.  

जिल्हा पोलिस प्रमुख गेडाम यांच्या मार्गदर्शनाखाली सन 2020 मध्ये मोक्याचे 6 प्रस्ताव पाठवण्यात आले होते. त्यातील तीन प्रस्तावांना मंजुरी मिळाली आहे. तर सन 2021 मध्ये 8 प्रस्ताव पाठवण्यात आले. त्यातील दोन प्रस्तावांना मंजुरी मिळाली आहे. एकंदरीत प्रतिबंधात्मक कारवाईत सन 2020 च्या तुलनेत सन 2021 मध्ये सर्वाधिक प्रस्ताव पाठवण्यात आल्याचे आकडेवारीवरून सिद्ध होते.

सन 2021 मध्ये अंमली पदार्थविरोधी 44 गुन्हे, जुगारप्रकरणी 598, बेकायदा दारूप्रकरणी 1236, गुटख्याप्रकरणी 31 असे 1909 गुन्हे दाखल करून 2220 जणांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून 2 कोटी 13 लाख 77 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. जिल्हा पोलिस प्रमुख दीक्षित गेडाम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस दलाची घोडदौड जोरदारपणे सुरू असल्याचे सिद्ध होत आहे. 


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.