Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

श्री सुरेश अण्णा उर्फ परफेक्ट मॅनेजमेंट....

 श्री सुरेश अण्णा उर्फ  परफेक्ट मॅनेजमेंट....


कार्यक्रम कोणताही असो,कितीही विशाल असो एकदा त्याचे नियोजन सुरेश अण्णांनी स्वीकारले म्हणजे काटेकोर नियोजन आणि अचूक अंमलबजावणी होतेच आणि त्यामुळेच आता सुरेश पाटील साहेब आणि परफेक्ट मॅनेजमेंट हे एकार्थवाची झाले आहेत. दक्षिण भारत जैन सभेच्या इतिहासिक अधिवेशनासाठीची पार्किंग व्यवस्था जबाबदारी सुरेश अण्णांकडे आल्यानंतर पंधरा दिवस संपूर्ण त्याचं प्लॅनिंग केलं गेलं. कर्नाटकातून म्हैसाळ रोड वरून येणाऱ्या वाहनांची व्यवस्था विलिंग्डन कॉलेजच्या 40 एकर जागेमध्ये केली गेली. त्याचप्रमाणे कोल्हापूर रोड, शिरोळ, बोरगाव,चिकोडी-निपाणी या बाबतींत येणाऱ्या वाहनांची संख्या व्यवस्था ही आदिनाथ मगदूम धामणीकर यांच्या सहकार्यामुळे धामणी रोडच्या असणाऱ्या पंधरा एकर जागेमध्ये व्यवस्था केली त्याचप्रमाणे महापालिकेचा आंबेडकर स्टेडियम व जिल्हा परिषद शेजारी इंग्लिश स्कूलची जागाही तयारी करून ठेवली होती. आष्टा, भिलवडी, नांद्रे- माधवनगर या भागातून येणाऱ्या सर्व वाहनांसाठी संपूर्ण मार्केट यार्डातील रस्ते खुले करून त्याठिकाणी पार्किंग  व्यवस्था केली.यासाठी शितल पाटील मार्केट कमिटी संचालक यांनी सहकार्य केले. त्याचप्रमाणे दामाणी हायस्कूल याठिकाणी सुद्धा मोटरसायकल दुचाकींची पार्किंग व्यवस्था केली. एवढ्या सर्व मोठ्या प्रमाणावर श्रावक येऊनसुद्धा कुठेही गडबड गोंधळ ट्राफिक जाम झाला नाही. संपूर्ण प्रशासन यंत्रणा व पोलिस यंत्रणेकडून याचं खूप कौतुक केलं गेलं. 



अमोल मोहन चौगुले इंजिनियर यांचेकडून यासर्व पार्किंगच्या व्यवस्थेचा व्यवस्थित आराखडा तयार करून घेतला गेला.त्याप्रमाणे त्याचे मार्किंग केले गेले. बसची सुविधा ए बी पाटील इंग्लिश स्कूलच्या 9 बसेस या पार्किंग स्थळापासून कार्यक्रम स्थळापर्यंत लोकांना आणण्यासाठी तैनात केल्या गेल्या होत्या.  पार्किंग स्थळावर संपूर्ण ड्रायव्हर लोकांसाठी पाण्याची व भोजनाची व्यवस्था केली गेली होती. वीराचार्य पतसंस्थेचे सीईओ शीतल मसुगडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी फार मोठे सहकार्य केले वीर सेवादलाचे अध्यक्ष राजोबा सर व त्यांच्या सहकाऱ्यांनी मोलाची कामगिरी बजावली. एवढ्या मोठ्या प्रमाणावर वाहने घेऊन सुद्धा कार्यक्रम सांगली शहराच्या चारी बाजुला पार्किंगची व्यवस्था केल्यामुळे अंतर्गत भागात कोणतीही गडबड गोंधळ झालेला नाही, यासाठी सहकार्य केलेल्या कार्यकर्त्यांचं हार्दिक अभिनंदन. या महा अधिवेशनाच्या निमित्ताने श्री सुरेश अण्णांनी नियोजन केलेल्या पार्किंग आणि भोजन व्यवस्था ही मोठ्या कार्यक्रमाचे परफेक्ट मॅनेजमेंट यारूपाने भविष्यात देखील सातत्याने आठवण केली जाईल.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.