Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

तक्रार न करण्यासाठी सदुनिचा संशयितावर दबाव

तक्रार न करण्यासाठी सदुनिचा संशयितावर दबाव


दबावाबाबत सांगलीतील वरीष्ठ अधिकाऱ्यांचेही दुलर्क्ष

सांगली : इस्लामपूर येथील गोवा बनावट दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार असलेल्या त्या सदुनिला सांगलीतील वरीष्ठ अधिकाऱ्यांनी अभय दिल्याची चचार् आहे. दरम्यान या प्रकरणातील संशयिताने त्या सदुनिविरोधात कोठेही तक्रार करू नये यासाठी त्याच्यावर दबाव टाकला जात असल्याचे बोलले जात आहे. याबाबत त्या संशयिताने सांगलीतील वरीष्ठ अधिकाऱ्यांकडेही तक्रार केली आहे. मात्र त्याकडे सांगलीतील वरीष्ठ अधिकारी दुलर्क्ष करत असल्याचा आरोप केला जात आहे.   

इस्लामपूर येथे गेल्या महिन्यात गोवा बनावटीच्या दारूचा कंटेनर पकडण्यात आला होता. याप्रकरणात एकावर गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. दरम्यान त्या संशयिताची चारचाकी गाडी आणि मोबाईल एक्साईजच्या अधिकाऱ्यांनी जप्त केला होता. त्याच दरम्यान त्या संशयिताने दारू आणण्यास भाग पाडल्याप्रकरणी तसेच पैशांची मागणी पूणर् केली नाही म्हणून गुन्ह्यात अडकवल्याचा आरोप केला होता. त्याबाबत संशयिताने त्या सदुनिविरोधात सांगलीतील वरीष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार केली होती. मात्र त्या सदुनिवर अद्याप कारवाई झालेली नाही. संशयिताला त्याची गाडी आणि मोबाईल देतानाही त्याला त्रास दिल्याचा आरोप त्या संशयिताने केला आहे. दरम्यान त्या संशयिताने वरीष्ठांकडे तक्रार केल्याचे समजल्यानंतर त्या सदुनिने संशयितावर तक्रार न करण्यासाठी धमकावल्याची चचार् आहे. शिवाय कोणाकडेही तक्रार कर मला काहीही होणार नाही असा दमही त्याने दिल्याचे बोलले जात आहे. शिवाय केलेल्या तक्रारी मागे घेण्यासाठी त्या सदुनिकडून संशयिताला सातत्याने धमक्या देऊन त्याच्यावर दबाव टाकला जात असल्याचे समजते.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.