Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

मिरज जलशुद्धीकरण केंद्राच्या टॅंकमधील गाळ काढणेचे काम पूर्ण : आजपासून ट्युबलर टॅन्कची स्वच्छता होणार

मिरज जलशुद्धीकरण केंद्राच्या टॅंकमधील गाळ काढणेचे काम पूर्ण : आजपासून ट्युबलर टॅन्कची स्वच्छता होणार  


टॅन्कमधील 10 फूट गाळ कर्मचाऱ्यानी काढला आयुक्त नितीन कापडणीस यांच्या आदेशानुसार टँकची स्वच्छता यापुढे मिरजेला आणखी मुबलक पाणी मिळणार


मिरज: महापालिकेच्या मिरज जलशुद्धीकरण केंद्रातील सेटलीग टॅंक मधील गाळ काढण्याचे काम पूर्ण झाले आहे . शुक्रवारपासून ट्युबलर सेटिंग टॅंकमधील  गाळ काढण्याचे काम सुरू  केले जाणार आहे. मनपा आयुक्त नितीन कापडणीस यांच्या आदेशानुसार हे काम सुरू आहे. 

मिरजेत महापालिकेचे जलशुद्धीकरण केंद्र आहे. या जलशुद्धीकरण केंद्रातून मिरज शहराला दररोज 25 ते 30 एमएलडी पाणीपुरवठा केला जातो. या जलशुद्धीकरण केंद्रात थेट नदी पात्रातून पाणी आणून त्याचे शुद्धीकरण केले जात असल्याने नदीचा गाळही मोठ्या प्रमाणात येतो. त्यामुळे हा गाळ जलशुद्धीकरण केंद्राच्या टँकमध्येच साचून राहतो. 


यापूर्वी 2015 च्या आसपास या जलशुद्धीकरण केंद्रातील सेटलिंग आणि ट्युबलर सेटिंग टॅंकची स्वच्छता करीत गाळ काढण्यात आला होता. या यादरम्यान मोठ्या प्रमाणात गाळ साचल्याने पाणी शुद्धीकरण प्रक्रियेमध्ये अडथळे येत होते. यामुळे शहराच्या पाणी पुरवठयावर सुद्धा परिणाम होत होता. याची दखल घेत मनपा आयुक्त नितीन कापडणीस यांनी मिरज जलशुद्धीकरण केंद्रातील दोन्ही टॅंकमधील गाळ काढण्याचे आदेश दिले होते.


यानुसार 14 मे 2022 पासून पहिल्यांदा सेटलिंग टॅंकमधील गाळ काढण्याचे काम सुरू करण्यात आले. हे काम गुरुवारी पूर्ण झाले असून शुक्रवारपासून ट्युबलर सेटिंग टॅंकमधील गाळ काढणेचे काम सुरु होणार आहे. सेटलिंग टॅन्कमधून मोठ्या प्रमाणात गाळ काढण्यात आला असून यामुळे जलशुद्धीकरण टॅन्कची शुद्धीकरण क्षमता 10 फुटांनी वाढणार आहे. हे काम रविवारपर्यंत पूर्ण होणार असून सोमवारपासून मिरजकर जनतेला नियमित पाणीपुरवठा केला जाणार आहे. उपायुक्त संजीव ओव्होळ आणि अधीक्षक सुनील पाटील यांच्या उपस्थितीत मिरज पाणीपुरवठा अभियंता बीआर पांडव यांची टीम यासाठी कार्यरत आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.