Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

पाळीव प्राण्यांची दुकाने व श्वान प्रजनन केंद्रांची नोंदणी करा अन्यथा कारवाई - जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. एस. ए. धकाते

पाळीव प्राण्यांची दुकाने व श्वान प्रजनन केंद्रांची नोंदणी करा अन्यथा कारवाई - जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. एस. ए. धकाते


सांगली दि. 17  : प्राण्यांना क्रुरतेने वागविण्यास प्रतिबंध करण्याबाबत अधिनियम, १९६० अंतर्गत पाळीव प्राणी दुकान नियम, २०१८ आणि श्वान प्रजनन व विपणन नियम, २०१७ मधील तरतुदींनुसार जिल्ह्यातील पाळीव प्राण्यांची दुकाने (पेट शॉप्स मालक/ व्यावसायिक) तसेच श्वान प्रजनन केंद्रांची (डॉग ब्रीडिंग सेंटर मालक/ व्यावसायिक) महाराष्ट्र प्राणी कल्याण मंडळाकडे नोंदणी करणे बंधनकारक आहे. 

तरी येत्या ३० दिवसांच्या कालावधीत पाळीव प्राण्याची दुकाने, श्वान प्रजनन केंद्राची जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त कार्यालय, सांगली (मुख्यालय मिरज) या कार्यालयामार्फत रितसर कायदेशीर नोंदणी करावी. अन्यथा प्राण्यांना क्रुरतेने वागविण्यास प्रतिबंध करण्याबाबत अधिनियम, १९६० अन्वये कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल याची नोंद घ्यावी, असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. एस. ए. धकाते यांनी केले आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.