शुटिंग, सायकलींग व ॲथलेटिक्स खेळाच्या निवड चाचणीसाठी 20 मे पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन
सांगली दि. 17 : केंद्र शासन व क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आंतराष्ट्रीय खेळाडू निर्माण करण्याच्या उद्देशाने खेलो इंडिया राज्य निपुणता केंद्रांतर्गत शुटिंग, सायकलींग व ॲथलेटिक्स या तीन खेळ बाबींसाठी निवड चाचणीचे आयोजन शिवछत्रपती क्रीडा संकुल, म्हाळुंगे-बालेवाडी, पुणे येथे दिनांक 30 ते 31 मे 2022 या कालावधीत करण्यात आले आहे. यासाठी पात्र खेळाडूंनी विहीत नमुन्यातील अर्ज 20 मे पर्यंत सादर करावेत, असे आवाहन जिल्हाा क्रीडा अधिकारी माणिक वाघमारे यांनी केले आहे.
निवड चाचणीकरिता राज्यस्तर प्राविण्यप्राप्त व राष्ट्रीयस्तर सहभाग असलेले खेळाडू पात्र राहणार आहेत. अशा पात्र खेळाडूंनी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, सांगली “साई फिटनेस सेंटर, नविन इमारत, मालु हायस्कूल समोर, गुलमोहर कॉलनी, दक्षिण शिवाजी नगर, सांगली” येथे खेळनिहाय विहीत नमुन्यातील अर्ज भरुन जन्माचा दाखला आणि जन्मतारखेची नोंद असलेल्या संबंधित शाळेच्या जनरल रजिस्टरची छायांकीत प्रतीसह दिनांक 20 मे 2022 पर्यंत सादर करण्याचे आवाहन जिल्हाी क्रीडा अधिकारी श्री. वाघमारे यांनी केले आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.

