Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

कोयनेचा आज ६० वा वाढदिवस...

 कोयनेचा आज ६० वा वाढदिवस...आज १६ मे २०२२ रोजी  कोयना  हायड्रो इलेक्ट्रीक पॅावर स्टेशनचा ६० वा वाढदिवस आहे. कोयना या  अक्षराचा उच्चार केला की, समोर आकाशातील  विजेचे चिन्ह उभे राहते. कोयना योजना महाराष्ट्राची भाग्यरेखा आहे.

२६ जानेवारी  १९५४ रोजी तत्कालीन मुख्यमंत्री मोरारजीभाई देसाई यांचे हस्ते कोयनेची ओटी भरण्यात आली व धरणाचे काम सुरू करण्यात आले. प्रकल्पाचे सर्व काम १९६१ साली पुर्ण झाल्यावर पावसाळ्यात धरण भरण्यास सुरवात झाली. दरम्यान पोफळी बोगदा पुर्ण झाला.

१६ मे १९६२ रोजी संयुक्त महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री मा. यशवंतराव चव्हाण यांच्या शुभ हस्ते  पोफळी येथील विदुत केंद्राचे उद्घाटन करण्यात आले व महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात वीज निर्मिती सुरू  झाली. यानंतर महाराष्ट्र राज्यातील खेड्यांमध्ये वीज वितरण सुरू झाले. खरोखरच तो दिवस भाग्याचा होता व  त्याला आज ६०  वर्षे  पूर्ण होत आहेत.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.