Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

महाराष्ट्र विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेता प्रविण दरेकर यांचा सांगली जिल्हा दौरा

 महाराष्ट्र विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेता प्रविण दरेकर यांचा सांगली जिल्हा दौरा 


        

   सांगली, दि. 23, : महाराष्ट्र विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेता प्रविण दरेकर हे मंगळवार दि. 24 मे 2022 रोजी सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांच्या दौऱ्याचा सविस्तर कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. मंगळवार दि. 24 मे  रोजी सकाळी 5.22 वाजता सांगली रेल्वे स्टेशन येथे आगमन व शासकीय विश्रामगृहाकडे प्रयाण. सकाळी 5.40 वाजता शासकीय विश्रामगृह सांगली येथे आगमन व राखीव. सकाळी 9.45 वाजता शासकीय विश्रामगृह सांगली येथून विश्रामबाग सांगली कडे प्रयाण. सकाळी 10 वाजता विश्रामबाग सांगली येथे आगमन व भाजपा प्रदेश कार्यकारणी आभासी (vertual) बैठकीस उपस्थिती, स्थळ - आमदार सुधीर गाडगीळ यांचे संपर्क कार्यालय, विश्रामबाग सांगली. दुपारी 12 वाजता विश्रामबाग सांगली येथून माधवनगर कडे प्रयाण.

दुपारी 12.15 वाजता शिवाजी डोंगरे यांच्या निवासस्थानी आगमन व राखीव, स्थळ- माधवनगर. दुपारी 12.45 वाजता माधवनगर येथून झरे ता. आटपाडी कडे प्रयाण. दुपारी 2 वाजता  झरे येथे आगमन व आमदार गोपीचंद पडळकर यांच्या निवासस्थानी आगमन व राखीव, स्थळ - झरे.  सोईनुसार आटपाडी तालुक्याच्या माने, जांभुळणी, पिंपरी (बु.), पडळकरवाडी, पारेकरवाडी, कुरूंदवाडी, झरे, वाक्षेवाडी, निंबवडे, तळवडे, बनपुरी या गावातील कामांच्या भुमीपुजन व लोकार्पण सोहळ्यास उपस्थिती. सायंकाळी 6 वाजता शेतकरी मेळाव्यास उपस्थिती, स्थळ - ग्रामपंचायत कार्यालयाजवळ बनपुरी, ता. आटपाडी. रात्री 8 वाजता आटपाडी येथून सांगली कडे प्रयाण. रात्री 9.15 वाजता सांगली रेल्वे स्टेशन येथे आगमन व राखीव. रात्री 10.05 वाजता सांगली रेव्ले स्टेशन येथून मुंबई कडे महालक्ष्मी एक्सप्रेसने प्रयाण.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.