Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

छत्रपती शिवाजी स्टेडियम विकसनासाठी समिती

छत्रपती शिवाजी स्टेडियम विकसनासाठी समिती


छत्रपती शिवाजी स्टेडियम विकसनासाठी समिती  : आयुक्त नितीन कापडणीस यांचा निर्णय : महापौरांच्या अध्यक्षतेखालील समिती होणार गठीत: विकसनाबाबत समितीकडून आलेल्या आराखड्यानुसार विकसन केले जाईल : क्रीडांगणासाठी आवश्यक सर्व सुविधाही उपलब्ध केल्या जातील : भविष्यात महापालिका खेळाडू दत्तक घेणार : आयुक्तांची ग्वाही पुढचा निर्णय होईपर्यंत भुयारी ड्रेनेज काम करण्यावर एकमत 

सांगलीतील छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमच्या विकसनासाठी  समिती गठीत करण्याचा निर्णय महापालिका आयुक्त नितीन कापडणीस यांनी घेतला आहे. महापौर दिग्विजय सुर्यवंशी यांच्या उपस्थितीत महापालिकेत आयोजित बैठकीत आयुक्त कापडणीस यांनी याबाबतची घोषणा केली. 

छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमच्या विकसनाबाबत महापालिकेचे सर्व पदाधिकारी आणि स्थानिक क्रीडा संस्थाचे प्रतिनिधी यांची एक बैठक डॉ वसंतदादा पाटील सभागृहात आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस महापौर दिग्विजय सुर्यवंशी, मनपाआयुक्त नितीन कापडणीस, गटनेते सिंहासने , स्थायी सभापती निरंजन आवटी , विरोधी पक्षनेते संजय मेंढे , राष्ट्रवादीचे गटनेते मैनुदिन बागवान, नियोजन समिती सदस्य संजय बजाज  यांची प्रमुख उपस्थिती होती. 

या बैठकीत सर्व क्रीडा संस्था प्रतिनिधींनी आपली मते मांडली. यावेळी सर्वांच्या भावना समजून घेत आयुक्त नितीन कापडणीस यांनी छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमच्या विकसनाबाबत महापौरांच्या अध्यक्षतेखालील आणि उपायुक्त तसेच क्रीडा संस्थांचे प्रतिनिधी यांचा समावेश असणारी समिती गठीत करण्याचा निर्णय घेतला. स्टेडियमच्या विकसनाबाबत नेमका कसा आराखडा हवा याबाबत समितीनेच निश्चिती करून समितीकडून आलेल्या आराखड्यानुसार छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणाचे विकसन केले जाईल असे जाहीर केले. 


 तसेच लवकरात लवकर क्रीडांगणासाठी आवश्यक सर्व सुविधाहीही उपलब्ध केल्या जातील असे आयुक्त कापडणीस यांनी सांगितले. याचबरोबर भविष्यात महापालिका खेळाडू दत्तक घेणार असल्याचेही आयुक्त कापडणीस यांनी स्पष्ट केले. तसेच पुढचा निर्णय होईपर्यंत स्टेडियमचे भुयारी ड्रेनेज काम करण्यावर या बैठकीत एकमत झाले. बैठकीस नगरसेवक संतोष पाटील , विष्णू माने, जगन्नाथ ठोकळे, नगरसेविका वर्षा निंबाळकर, माजी नगरसेवक मुन्ना कुरणे पै. पृथ्वीराज पवार, विकास कदम, शहर मनपाचे अभियंता संजय देसाई, क्रीडाधिकारी महेश पाटील, क्रीडा संस्थांचे प्रतिनिधी अविनाश सावंत, युवराज कटके, संजय पाटील, सुरेश चौधरी बापू समलेवाले, शेरखान कुरणे , संतोष लोखंडे आदी उपस्थित होते.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.