Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

बाटली उघडल्यानंतर किती दिवस टिकते दारू?

 बाटली उघडल्यानंतर किती दिवस टिकते दारू?


मुंबई, 21 मे : दारू पिणारे लोक हे नेहमी वाईटच असतील असं नाही. कित्येक लोक चवीने, शिस्तीत दारू पितात. यामध्ये मग कधीतरी बाहेर पार्टीमध्ये वगैरे दारू पिणारे, किंवा मग एखाद्या खासप्रसंगी घरीच दारू पिणारे अशा विविध लोकांचा समावेश होतो. कित्येक लोकांना आपल्या घरी दारूची बाटली ठेवण्याची सवय असते. अगदी दररोज नसलं, तरी एखाद्या खास निमित्ताने ते थोडी-थोडी दारू त्यातून पितात. त्यानंतर ते दारूची बाटली पुन्हा लावून ठेवून देतात. 

तुम्ही कधी विचार केलाय, की असं एखादी व्यक्ती नेमकं कधीपर्यंत करू शकते?

वाईनच्या बाबतीत तुम्ही हे नक्कीच ऐकून असाल, की ती जेवढी जुनी असेल तेवढी अधिक चवदार होते. मात्र, हीच बाब प्रत्येक प्रकारच्या दारूला लागू होते का? किंवा मग वाईनची बाटली एकदा उघडल्यानंतर ती किती दिवस टिकते? दारूला एक्सपायरी डेट असते का?

असे प्रश्न जर तुम्हाला पडले असतील, तर त्यांची उत्तरं आज आम्ही देणार आहोत. सुरुवात करूया व्हिस्कीपासून. वाईनप्रमाणेच व्हिस्कीदेखील वर्षानुवर्षे चांगल्या स्थितीत राहू शकते. मात्र, याला सर्वांत मोठी अट म्हणजे - ज्या बाटलीत तुम्ही व्हिस्की ठेवली आहे ती एकदम एअर टाईट हवी. म्हणजेच जर एखाद्या हवाबंद बाटलीत तुम्ही व्हिस्की ठेवलीत, तर ती आजपासून 100 वर्षांनीदेखील तुम्ही पिऊ शकता.

मात्र, हीच बाटली एकदा का उघडली गेली, तर हवेतील ऑक्सिजन आतमध्ये जाऊन व्हिस्कीतील घटकांसोबत प्रक्रिया करण्यास सुरुवात करतो. मात्र तरीही, एकदा उघडल्यानंतर तुम्ही त्या बाटलीमधील व्हिस्की पुढे किमान दोन वर्षांपर्यंत नक्कीच पिऊ शकता. त्यानंतरही तुम्ही जर ती व्हिस्की प्याल तर तुमच्या जीवाला धोका नाही. मात्र, बरचसं अल्कोहोल उडून गेल्यामुळे जी 'किक' तुम्हाला बसायला हवी ती बसत नाही.

मग अशी व्हिस्की पिण्यात मजाच काय? व्हिस्कीपेक्षा व्होडकाच बरा व्हिस्कीप्रमाणेच व्होडकाही बरीच वर्षं टिकणारी दारू आहे. विशेष म्हणजे, बाटली उघडल्यानंतरही तुम्ही कित्येक वर्षे व्होडकाचा आनंद घेऊ शकता. व्हिस्की जिथे दोन ते तीन वर्षांमध्येच बेचव आणि कमी परिणामकारक होऊ लागते, तिथेच व्होडका मात्र 10 वर्षांहून अधिक काळ सुस्थितीत राहू शकतो.


अर्थात, त्यानंतर मात्र त्यातील अल्कोहोलचं प्रमाण कमी होत जातं. सहा महिन्यात संपवा हे प्रकार व्हिस्कीप्रमाणेच रम  देखील हवाबंद ठेवल्यास बरीच वर्षे टिकू शकते. मात्र, एकदा का बाटली उघडली की केवळ सहा महिन्यांत तुम्हाला ती संपवावी लागते. जी गत रमची, तिच ब्रँडीची.

अगदी वेगळ्या पद्धतीने बनवल्या गेल्या असल्या, तरी या दोन्ही प्रकारच्या दारूंचा वापर हा बाटली उघडल्यापासून सहा महिन्यांच्या आतच केलेला बरा असतो. सहा महिन्यांच्या कालावधीनंतर या दोन्ही प्रकारच्या मद्यांची चव बदललेली आपल्याला जाणवते. रमचा परिणामदेखील कमी होऊ लागतो. ब्रँडीचा परिणाम दोन ते तीन वर्षांपर्यंत सारखाच राहत असला, तरी त्याची चव बदलल्यामुळे बऱ्याच जणांना ती प्यायला नकोशी वाटते.

हे प्रकार होऊन जातील बेचव जिन  आणि टकीला हे मद्याचे प्रकार एकदा बाटली उघडल्यानंतर वर्षभरापर्यंत तुम्ही वापरू शकता. त्यानंतर मात्र त्यांची चव बदलायला सुरूवात होते, आणि त्याचा परिणामही कमी होऊ लागतो. मेस्कॅलच्या  बाबतीतही हाच नियम लागू होतो. काही मद्यांचे फ्लेवर्ड प्रकारही आपण पाहिले आहेत.

विविध प्रकारचे फ्लेवर असलेली दारू ही आणखी लवकर संपवावी लागते. याला कारण म्हणजे त्यातील साखरेचं प्रमाण हे अधिक असतं. यामुळे पडाल आजारी बरेचशे लिकर आणि कॉर्डिअल  हे एक ते दोन वर्षांच्या आतच संपवावेत. कॉर्डिअल आणि इतर मद्य प्रकारांमध्ये फरक म्हणजे, ठराविक वेळेनंतर इतर प्रकारची दारू केवळ बेचव होत जाते.

मात्र, कॉर्डिअल हे पूर्णपणे 'खराब' होते. सोबतच, डेअरी प्रॉडक्ट्सचा  वापर करून तयार करण्यात आलेली दारूही वर्षाच्या आतच संपवावी. अशा प्रकारची दारू ही हवाबंद बाटल्यांमध्येही जास्त काळ टिकत नाही. अशी दारू भरपूर काळ ठेवून मग प्यायल्यास तुम्ही आजारी पडण्याचा धोका असतो.

अशाप्रकारे घ्या तुमच्या दारूची काळजी तुम्ही आणलेली दारू अधिक काळ फ्रेश आणि तितकीच परिणामकारक ठेवण्यासाठी तुम्ही काही उपाय  करू शकता. यातील सर्वांत पहिली गोष्ट म्हणजे, दारूची बाटली ही नेहमी उभीच ठेवावी. ही बाटली आडवी किंवा उलटी ठेवल्यामुळे झाकणाच्या ठिकाणी झीज होऊन हवा आत जाऊ शकते. तसंच, लाकडी कॉर्क लावलेला असल्यास, तो आतील मद्याच्या संपर्कात येऊन त्यावर प्रक्रिया करू शकतो.

शिवाय या बाटल्या सूर्यप्रकाश आणि उष्णतेपासून दूर ठेवाव्यात. सर्वात महत्त्वाचं म्हणजे, तुम्ही जेवढ्या छोट्या बाटल्यांमध्ये मद्य ठेवाल  तेवढं चांगलं. असं केल्यामुळे तुम्ही थोडी दारू काढून घेतल्यानंतरही त्या बाटलीच्या आत जास्त ऑक्सिजन साठण्यास जागा राहत नाही. परिणामी, तुमची दारू बेचव होण्याची प्रक्रिया मंदावते. अर्थात, या बाटल्या हवाबंद असणं गरजेचं आहे. एकूणच दारूला कोणतीही एक्पायरी डेट नसली, तरीही कोणतीही दारू तुम्ही वर्षानुवर्षे ठेवू शकत नाही.



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.