Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

श्रीलंकेत लादलेली आणीबाणी अखेर मागे, भारताकडून ४० हजार टन डिझेलची मदत

 श्रीलंकेत लादलेली आणीबाणी अखेर मागे, भारताकडून ४० हजार टन डिझेलची मदत


कोलंबो : आर्थिक दिवाळखोरीच्या कड्यावर उभ्या असलेल्या श्रीलंकेतील सरकारने लादलेली आणीबाणी शनिवारपासून मागे घेतली. भारताने श्रीलंकेला आणखी ४० हजार टन डिझेलचा पुरवठा केला आहे. जपानने श्रीलंकेला अन्नधान्य, तसेच शाळेतील विद्यार्थ्यांच्या जेवणासाठी जागतिक अन्न कार्यक्रमाच्या माध्यमातून १५ लाख डॉलरची मदत केली आहे.

श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष गोताबाया राजपक्ष यांनी गेल्या ६ मे रोजी मध्यरात्रीपासून त्या देशात आणीबाणी लागू केली होती. आर्थिक दुरवस्थेमुळे, तसेच अन्नधान्य व जीवनावश्यक वस्तूंच्या तुटवड्यामुळे त्रस्त झालेल्या जनतेेचा श्रीलंका सरकारविरोधात असंतोष उफाळून आला. त्यामुळे तेथील लोक सरकारचा निषेध करण्यासाठी रस्त्यावर उतरले होते. मात्र, आता स्थिती सुधारत असल्याचा दावा करीत श्रीलंका सरकारने आणीबाणी उठविली आहे.

भारताने शनिवारी श्रीलंकेला आणखी ४० हजार मेट्रिक टन डिझेलचा पुरवठा केला. गेल्या महिन्यात श्रीलंकेला इंधन तेल आयात करण्यासाठी भारताने ३८९० कोटी रुपयांची आर्थिक मदत दिली होती. श्रीलंकेच्या परकीय गंगाजळीत फारशी रक्कम शिल्लक न राहिल्याने तो देश विलक्षण अडचणीत आला. तिथे इंधन तेलाचा तुटवडा निर्माण झाला, तसेच महागाईदेखील गगनाला भिडली.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.