Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

आरपीआयची जिल्हाधिकारी कार्यालयवर विविध मागण्यासाठीसमोर निदर्शने

 आरपीआयची जिल्हाधिकारी कार्यालयवर विविध मागण्यासाठीसमोर निदर्शने


सांगली : राज्यामध्ये दलितांच्यावर अत्याचार वाढत आहेत, राज्यातील भुमी हिना एका कुटुंबाला पाच एकर जमीन उपलब्ध करून द्यावी, मराठा धनगर ओबीसींना आरक्षण द्यावे, महागाई कमी करावी या प्रमुख मागणीसाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षाच्या वतीने सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली यामध्ये प्रमुख मागण्या खालीलप्रमाणे १)राज्यात वाढत असलेले दलित अत्याचार रोखण्यासाठी शासनाने कठोर कारवाई करावी 

२) देशाबरोबर राज्यामध्ये महागाईने थैमान घातले असून सर्वसामान्य जनता मेटाकुटीला आले  गॅस डिझेल पेट्रोल तसेच अन्नधान्याच्या किमती वाढलेल्या आहेत सर्वसामान्यांना जगणे मुश्कील झाले आहे राज्य सरकारने जीवनावश्यक वस्तू वरिल कर कमी करावे यामुळे बऱ्यापैकी महागाई कमी होऊ शकते 

३) गायरान जमिनीवरील अतिक्रमण नियमित करण्यासाठी 14 एप्रिल 1990 चाली शासन निर्णय 14 एप्रिल 2000 सालापर्यंत गायरान जमिनीवर दलित भूमिहीनांच्या अतिक्रमणे कायमस्वरूपी नियमित करावे

 ४) राज्यातील भूमिहीनांना एका कुटुंबास पाच एकर शेती उपलब्ध करून देण्यात यावे 

५) राज्य सरकारने नोकरीमध्ये मागासवर्गीयांचा अनुशेष भरून काढावा 

६) मराठा समाजातील आर्थिक दुर्बल गरीबांना आरक्षण लागू करावे 

७) स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये इतर मागासवर्गीय ओबीसी समाजाला आरक्षण लागू करावे या बाबत सुप्रीम कोर्टामध्ये योग्य बाजू मांडली नसल्यामुळे मराठा आणि ओबीसी समाजाचा आरक्षण रद्द झाले आहे याला राज्य सरकारचा विचार आहे महाविकास आघाडी सरकार राज्य सरकारचा रिपब्लिकन पक्षाच्या वतिने तीव्र निषेध करण्यात आला यासाठी न्यायालयाचे पालन करून यापूर्वीच्या आवश्यक उपाययोजना केल्या असतील तर ओबीसीचे आरक्षण अबाधित राहिले असते महाराष्ट्र शासनाच्या कुचकामी धोरणामुळे ओबीसी बांधवावर अन्याय झाला आहे त्यामुळे भविष्यात राजकीय आरक्षण द्यावे अशी मागणी आरपीआयच्या वतीने करण्यात आले 

या विविध मागण्यांसाठी आज सांगलीतील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रिपब्लिकन पक्षाच्या वतीने निदर्शने करून  अप्पर जिल्हाधिकारी यांना आरपीआयचे प्रदेश सचिव माजी महापौर विवेक कांबळे पश्चिम महाराष्र्ट सरचिटणिस तथा नगरसेवक जगन्नाथ ठोकळे यांच्या हस्ते निवेदन देण्यात आले यावेळी रोजगार आघाडी सांगली जिल्ह्याचे आरपीआयचे अध्यक्ष अरुण आठवले महिला आघाडीच्या अध्यक्षा छाया सरवदे तानाजी ऐवळे  संतोष वाघमारे राहुल गट्टे माणिक गस्ते आशा साबळे  शिवाजी वाघमारे राहुल साबळे प्रमोद कांबळे मनोहर मागाडे अजय उबाळे दिनेश साबळे बापू सोनवणे सुमित कांबळे कमल कांबळे चित्रा घोडके दिनेश साबळे निलेश पवार मुजावर स्वप्निल कांबळे इत्यादी उपस्थित होते यावेळी महाराष्ट्र आघाडी सरकारचा आणि केंद्र सरकारचा तीव्र निषेध करण्यात आला महागाई कमी न झाल्यास येणाऱ्या काळामध्ये तीव्र आंदोलन करण्याचा इशारा आरपीआयच्या वतीने देण्यात आला आहे


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.