Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

विशेष रस्ता अनुदान अंतर्गत पलुस नगरपरिषदेला १ कोटी ७५ लाख निधी मंजूर राज्यमंत्री, डॉ. विश्वजीत कदम

विशेष रस्ता अनुदान अंतर्गत पलुस नगरपरिषदेला १ कोटी ७५ लाख निधी मंजूर राज्यमंत्री, डॉ. विश्वजीत कदम 


 

मुंबई दि.10:  राज्यातील महानगरपालिका / नगरपरिषदा नगरपंचायत यांना रस्ता तसेच तद्अनुषंगिक बाबींचा विकास कामांसाठी " विशेष रस्ता अनुदान" अंतर्गत पलुस नगरपरिषदेला १ कोटी ७५ लाख निधीला आज मान्यता देण्यात आली असल्याची माहिती राज्यमंत्री, डॉ. विश्वजीत कदम यांनी दिली आहे.

नगर विकास विभागाच्या माध्यमातून दिल्या जाणाऱ्या विशेष रस्ता अनुदान अंतर्गत पलुस नगरपरिषदेच्या शेत्रातील रस्ते विकासासाठी गती मिळाणार असल्याची माहिती डॉ. कदम यांनी दिली. या निधीच्या उपलब्धतेसाठी सदर विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत तसेच मंत्री एकनाथ शिंदे यांच्या कडे सातत्याने पाठपुरावा करून हा विकास निधी उपलब्ध करून डॉ. विश्वजीत कदम यांनी विकास कामांसाठी विशेष प्रयत्न करुन विकासाची कामे मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केले आहेत.

सदर विकास कामांमध्ये भारतीनगर व भोसलेनगर ( प्रभाग नं .१) अंतर्गत रस्ते व गटार सुधारणा करणे साठी रू  २८ लक्ष , तासगाव कराड रस्ता ते चिंचेच्या मळ्यास जोडणारा रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे रु २२ लक्ष , पंडित विष्णू दिगंबर शाळेनजीक गाव ओढ्यावर कॅनॉल टाईप गटार साधनेसाठी रू ४० लक्ष , कोयना वसाहत अंतर्गत रस्ता खडीकरण डांबरीकरण करणेसाठी रू १०लक्ष, ए.आर.पाटील घर ते विश्वास पाटील ( इनामपट्टा ) घरापर्यंत रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे रू २५ लक्ष ,बाबा हवेली ते गुरव गुरुजी घरापर्यंत आर .सी.सी गटार बांधकाम करणे रु २५ लक्ष ,आमणापुर रोड ते गंजीखाना रस्ता सुधारणा करणेसाठी रू २५ लक्ष.आदी कामांसाठी निधी उपलब्ध झाला असून या माध्यमातून पलूस नगरपरिषद क्षेत्रांतील कामासाठी निधी उपलब्ध करुन देण्यात आला आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.