Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

संभाव्य आपत्तीच्या पार्श्वभूमीवर महापालिकेकडून नगरसेवक, पदाधिकारी, एनजीओ यांची नियोजन बैठक संपन्न

संभाव्य आपत्तीच्या पार्श्वभूमीवर महापालिकेकडून नगरसेवक, पदाधिकारी, एनजीओ यांची नियोजन बैठक संपन्न


आपत्ती काळात पदाधिकारी, एनजीओनी महापालिकेच्या मदतीला यावं : महापौर दिग्विजय सुर्यवंशी आणि आयुक्त नितीन कापडणीस यांचे आवाहन नुकसान टाळण्यासाठी नागरिक , व्यापाऱ्यांनी कमीतकमी साहित्य ठेवावे 


सांगली : पावसाळ्यात उद्भवणाऱ्या संभाव्य आपत्तीच्या पार्श्वभूमीवर महापालिकेकडून नगरसेवक, पदाधिकारी, एनजीओ यांची नियोजन बैठक घेण्यात आली.  महापौर दिग्विजय सुर्यवंशी आणि आयुक्त नितीन कापडणीस यांच्या उपस्थितीत महापालिका मुख्यालयात ही बैठक पार पडली. यावेळी आपत्ती काळात पदाधिकारी, एनजीओनी महापालिकेच्या मदतीला यावं असे आवाहन मनपा आयुक्त नितीन कापडणीस यांनी करत पूर काळात आपले नुकसान टाळण्यासाठी नागरिक , व्यापाऱ्यांनी घरी किंवा कमीतकमी साहित्य ठेवावे असे आवाहनही महापौर दिग्विजय सुर्यवंशी आणि आयुक्त नितीन कापडणीस यांनी सर्वाना केले आहे.

     यंदाच्या वर्षी 100 पावसाचा अंदाज वर्तवण्यात आल्याने संभाव्य निर्माण होणाऱ्या पुरपरिस्थिच्या पार्श्वभूमीवर नुकसान आणि जीवित हानी टाळण्यासाठी महापालिका नगरसेवक, पदाधिकारी, व्यापारी, एनजीओ यांची महापालिका प्रशासनाने आपत्तीपूर्व तयारी आणि नियोजन बैठक महापालिका मुख्यालयात घेतली. या बैठकीस महापौर दिग्विजय सुर्यवंशी आणि आयुक्त नितीन कापडणीस, गटनेते विनायक सिंहासने, स्थायी सभावती निरंजन आवटी, विरोधीपक्षनेते संजय मेंढे, उपायुक्त राहुल रोकडे, उपायुक्त संजीव ओहोळ यांची प्रमुख उपस्थिती होती. पहिल्यांदा महापालिकेच्या पूर पट्ट्यातील नगरसेवकांची बैठक घेतली. यावेळी अनेक नगरसेवकांनी आपल्या सूचना आणि पुरकाळात आणि नंतर मागीलवर्षी निर्माण झालेल्या समस्या याबाबत महत्वाच्या सूचना मनपा प्रशासनाला केल्या. यामध्ये पूर पट्ट्यातील पाणीपुरवठा विस्कळीत होऊ नये, पूर भागातील वाहन अन्यत्र हलवण्यात यावीत, पूर काळात नागरिकांना तात्पुरता निवारा केंद्र निर्माण करून त्यांना लागणाऱ्या भोजनसह अन्य गरजेच्या वस्तू पुरवण्याबाबत आणि पूर ओसारल्यानंतर तातडीची स्वच्छता व्हावी, पूर पाहण्यासाठी येणाऱ्या गर्दीवर नियंत्रण ठेवावे यासह अनेक विषयावर या बैठकीत चर्चा झाली. 

 या सर्व विषयावर चर्चा केल्यानंतर महापौर दिग्विजय सुर्यवंशी आणि आयुक्त नितीन कापडणीस यांनी या सर्व बाबींचा विचार करून तसेच नियोजन मनपा प्रशासनाकडून केले जाईल अशी ग्वाही दिली. तसेच आपत्ती काळात पूर पट्ट्यातील नगरसेवकांनी आपल्या भागातील नागरिकांशी समनव्य साधून नागरिकांच्या साहित्याचे नुकसान होऊ नये याबाबत जागृती करावी आणि पाणी पातळी वाढण्यापूर्वी नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवणेसाठी मनपा प्रशासनाला मदत करावी असे आवाहन आयुक्त कापडणीस यांनी केले तर आपत्ती काळात महापालिका अधिकारी आणि कर्मचारी यांनी जागरूकपणे आपले कर्तव्य आणि जबाबदारी पार पाडावी तसेच पुरपट्ट्यातील जनतेचे हाल होणार नाही आणि साहित्याचे नुकसान होणार नाही तसेच जीवित हानी होऊ नये याची खबरदारी घ्यावी असे आवाहनही आयुक्त नितीन कापडणीस यांनी केले आहे. 



दरम्यान, सायंकाळी मनपाक्षेत्रातील सर्व एनजीओ, सामाजिक कार्यकर्ते, प्राणी पशुमित्र याची बैठक महापौर दिग्विजय सुर्यवंशी आणि आयुक्त नितीन कापडणीस यांनी घेतली. या बैठकीस गटनेते विनायक सिंहासने, उपायुक्त राहुल रोकडे, उपायुक्त संजीव ओहोळ हे उपस्थित होते. या बैठकीत अनेक एनजीओ प्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते, पूर नियंत्रण समिती, सामाजिक कार्यकर्ते, प्राणीमित्र, स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते. यावेळी पूर पातळी माहितीपासून प्राण्यासाठी चाराछावणीपर्यंत अनेक महत्वाचे विषय मांडण्यात आले. तसेच पूर येणार नाही यासाठी नियोजन करण्याबाबतही अनेकांनी आपली मते मांडली. नव्याने झालेल्या राष्ट्रीय महामार्गाच्या भरावामुळे काही फटका बसेल का याबाबतही अनेकांनी प्रश्न उपस्थित केले. या सर्वांच्या सूचनेनुसार महापौर दिग्विजय सुर्यवंशी आणि आयुक्त नितीन कापडणीस यांनी सर्वांच्या प्रश्नांना समाधानकारक उत्तर देत सर्व सूचनांचे स्वागत करत त्याबाबत योग्य ती कार्यवाही केली जाईल अशी ग्वाही दिली. 

याचबरोबर पूर भागातील नागरिकांनी पुरकाळात आपले साहित्याचे किंवा अन्य वस्तूंचे नुकसान होऊ नये याची आतापासूनच दक्षता घेऊन आपल्याला आवश्यक साहित्य सोबत बाळगावे आणि अन्य साहित्य, किमती वस्तू, महत्वाची कागदपत्रे ही सुरक्षित ठिकाणी ठेवणेचे नियोजन करावे तसेच आपल्या चारचाकी आणि दुचाकी या आपल्या दारात पार्क न करता महापालिका प्रशासन जाहीर करेल त्या पार्किंग ठिकाणी पार्किंग करावीत. आपले पशुधन हे वेळीच सुरक्षित स्थळी हलवावेत , व्यापारी वर्गानेही आपल्या दुकानात कमीतकमी साहित्य साठा ठेवावा जेणेकरून ऐनवेळी आपल्या धान्य किंवा साहित्याचे नुकसान होणार नाही असे आवाहनही महापौर दिग्विजय सुर्यवंशी आणि आयुक्त नितीन कापडणीस यांनी केले. बैठकीस महापालिकेचे वैद्यकीय आरोग्यधिकारी डॉ रवींद्र ताटे, मुख्य अग्निशमन अधिकारी विजय पवार, नगरसचिव चंद्रकांत आडके, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सतीश सावंत यांच्यासह विविध एनजीओ, रेस्क्यू टीम, संस्था संघटना यांचे पदाधिकारी उपस्थित होते.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.