Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी म्हैसाळ येथे वनमोरे कुटुंबातील नातेवाईकांचे केले सांत्वन

केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी म्हैसाळ येथे वनमोरे कुटुंबातील नातेवाईकांचे केले सांत्वन


सांगली, दि. 22, : केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज मिरज तालुक्यातील म्हैसाळ येथील वनमोरे कुटुंबातील 9 जणांच्या झालेल्या सामुहिक मृत्यूप्रकरणाच्या घटनेबाबत म्हैसाळ येथे प्रत्यक्ष जावून घटनास्थळी भेट दिली व वनमोरे कुटुंबातील नातेवाईकांचे सांत्वन करून त्यांना धीर दिला.

केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या म्हैसाळ येथील भेट प्रसंगी जिल्हा पोलीस अधीक्षक दिक्षीत गेडाम, पोलीस उपअधीक्षक अशोक वीरकर, तहसिलदार डी. एस. कुंभार‍, माजी महापौर विवेक कांबळे आदि उपस्थित होते.


केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी म्हैसाळ येथील सामुहिक मृत्यूप्रकरणाच्या घटनेबाबत सविस्तर माहिती जाणून घेवून ही घटना अत्यंत दु:खदायी असल्याचे सांगून या प्रकरणी जर हा घातपात असेल तर पोलीस विभागास सखोल चौकशी करून कारवाई करण्याच्या सूचना  दिल्या. तसेच सावकारांच्या त्रासातून ही घटना घडली असेल तर आवश्यक ती कारवाई करण्याच्या सूचनाही त्यांनी पोलीस विभागाला दिल्या. यावेळी त्यांनी वनमोरे कुटुंबातील नातेवाईक अनिल वनमोरे, बाळासाहेब वनमोरे  यांच्याशी संवाद साधत त्यांना दिलासा देवून शासनाकडून मदत मिळवून देण्यासाठीही प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले. तसेच वनमोरे कुटुंबियांच्या दु:खात सहभागी असल्याचे सांगून दोन मिनीटे स्तब्धता पाळून मृतांना आदरांजली वाहिली.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.