Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

बिहारला मागे टाकून महाराष्ट्र नंबर-१ - मधुकर भावे

 बिहारला मागे टाकून महाराष्ट्र नंबर-१ - मधुकर भावे





बिहारमधील  सर्वपक्षीय राजकारणी खुशीत आहेत. राजकीय तोडफोड, मंत्रीमंडळ पाडापाडी, नवा मुख्यमंत्री, त्याला पुन्हा खाली खेचणे, आमदारांची पळवापळवी, या सर्व अराजकीय टोळीगिरीत देशात क्रमांक पहिला असलेल्या बिहारला महाराष्ट्राने मागे टाकलेले आहे. त्यामुळे आता िबहारची बदनामी कमी होवून महाराष्ट्राच्ाी बदनामी जास्त होत आहे. यामुळे बिहारचे राजकारणी खूष आहेत. बी. पी. मंडल यांच्यापासून सुरुवात झाली. भोला पासवानशास्त्री, दरोगा प्रसाद, सर्पूूरी ठाकूर, अब्दुल गफूर, जग्ान्नाथ मिश्रा, बिंदेश्वरी दुबे सत्यनारायण सिंहा, महामायाप्रसाद, लालूप्रसाद यादव, राबडीदेवी ते नितीशकुमार यांच्यापर्यंत गेल्या अनेक वर्षांत राजकीय तोडफोडीत बिहार आघाडीवर होते. महाराष्ट्राने हा क्रमांक मिळवला, याबद्दल बिहार खूष आहे. आिण यशवंतरावांचा महाराष्ट्र आता राहिलेला नाही. म्हणून महाराष्ट्रातील जनतेला तीव्र यातना होत आहेत. देशाला पुरोगामी धोरण स्वीकारायला भाग पाडणारा हाच का महाराष्ट्र? असा प्रश्न पडावा, असे काहीतरी भयंकर महाराष्ट्रात चालले आहे....  हे वाक्य लिहितो आहे तोच, अमेरिकेतील भल्या पहाटे एम.आय.टी.चे राहुल कराड यांचा ितथून फोन आला. नेमके हेच वाक्य ते म्हणाले.... ‘काय भयंकर चाललं आहे महाराष्ट्रात...’ त्यांचं पुढचं वाक्य होतं... ‘तो शपथविधी पहाटे ५.३० वाजता झाला. हा शपथविधी पहाटे ३  वाजता न होवो...’

गेल्या २० वर्षांत आमदार पळवले गेले.  आमदारांना बंगलोरमधील पंचतारांकीत हॉटेलमध्ये ठेवले गेले. त्याची बिले त्यावेळी कोणी िदली? ते आजपर्यंत कळले नाही. आता बंगलोरच्या पुढे सरहद्द ओलांडून आसाम गाठले गेले.  तिथपर्यंतही कोणी पाठलाग करेल म्हणून चीन गाठले नाही, हे काय काही कमी आहे? एकूणच राजकार नुसते किळसवाणे नाही तर िशसारी यावी, असेच आहे. महाराष्ट्र बदनाम झालाच.... आता हा कोणी केला? कसा झाला? याची चर्चा निरर्थक आहे. ती चर्चा करण्याच्या लायकेचेही राजकारणी राहिलेले नाहीत. 

त्यामुळे त्यांना यशवंतरावांचा महाराष्ट्र काय सांगायचा....? पण, जे चालले आहे त्यामुळे महाराष्ट्रची मान देशात ताठ रािहलेली नाही उलट असा अराजक असलेला महाराष्ट्र पहावा लागेल, असे कधीतरी वाटले होत का? आणि हे सगळे साठमारीचे सत्तेचे राजकारण आहे. पंचतारांकित हाॅटेल्स, मोठमोठ्या गाड्या हे राजकारण सामान्य माणसांचे तर अिजबात असू शकत नाही. आिण सामान्य माणसांसाठी नेमके केले काय? हे कोणी विचारूही शकत नाही... सामान्य माणसांनी ती अपेक्षा सोडून दिलेली आहे.  १९६० ते १९९५ या ३५ वर्षांत जे काही घडले त्यानंतर नवे काय घडले? महाराष्ट्राच्या राजकारणात ‘युती’ हा शब्द आला... आिण महाराष्ट्राच्या राजकारणाची माती झाली.


  ितथपासून सुरुवात झाली... मुंबई राज्य असेल िकंवा महाराष्ट्र राज्य असेल आज तो महाराष्ट्र राहिला नाही. ज्या महाराष्ट्राने देशाला आठ पुरोगामी कायदे िदले.... जे देशाला स्वीकारावे लागले.. आज कामगारही िचरडला गेला आिण कामगार शब्दही चिरडला गेला. आज कामगारमंत्री कोण आहे हे कोणालाही मािहतीही नाही आिण कोणाला त्याबद्दल कसली आत्मियताही नााही. पण याच विधानसभेत ‘औद्योगिक संबंधांविषयक’ विधेयकावर ३ एप्रिल १९४६ रोजी कॉम्रेड डांगे यांचे साडे सहा तास भाषण झाले होते. त्यानंतर कामगारांच्या हिताचा हा कायदा आला. तो देशाने स्वीकारला. १२ महिन्यांच्या कामाला १३ महिन्यांचा पगार...- हे बोनस तत्त्व म्हणून स्वीकारले गेले. ‘कसेल त्याची जमीन’ हा कायदा करून राबणाऱ्या शेतकऱ्याला शेतीचे मालक करण्याचा कायदा याच महाराष्ट्राने केला. सामािजक परिवर्तनात डॉ. आंबेडकरांच्या आंदोलनामुळे त्यावेळच्या सरकारने ‘सर्व जातींना मंिदर प्रवेश खुला’ करण्याचा कायदा याच महाराष्ट्राने केला. पुढे महाराष्ट्राच्याच 

डॉ. बाबासाहेबांनी घटनेमध्ये कलम घालून ‘अस्पृश्यता’ हा शब्दच नष्ट करून टाकला. 

याच महाराष्ट्राने (मुंबई राज्याने) १९३७ साली पुणे विद्यापीठाची स्थापना केली. १९४९ साली महिलांसाठी नाथीबाई ठाकरसी महिला विद्यापीठ स्थापन केले. माध्यमिक शालांन्त परिक्षा मंडळ, याच महाराष्ट्राने िनर्माण केले. खाजगी वाहतुकीचे राष्ट्रीयकरण करून १५ अॅागस्ट १९४८ ला याच महाराष्ट्रात एस.टी.ची पहिली गाडी पुणे-अहमदनगर अशी धावली. त्याचे पहिले प्रवासी बाळासाहेब भारदे हे होते. 

संयुक्त महाराष्ट्र झाल्यानंतर यशवंरावांनी सूत्रं हाती घेतली आिण सबंध देशाला जणू महाराष्ट्र हा पुरोगामी धोरणांचा मार्गदर्शक वाटला. ‘डोक्यावरून मैला वाहून न्यायला बंदी’ करणारे महाराष्ट्राचे विधानमंडळ हे देशातले पहिले राज्य. यशवंतरावांनी आग्रहाने तो कायदा करून घेतला. ‘माणसांची घाण माणसांनी डोक्यावर वाहून न्यायची नाही,’ या पुरोगामी कायद्याने संयुक्त महाराष्ट्राच्या विधानसभेची सुरुवात झाली. एवढेच नव्हे तर १९६२ च्या िनवडणुकीत मेहतर समाजाचा पहिला आमदार- त्रिकमदास मेमजादे- यांना यशवंरावांनी पुण्याच्या भवानीपेठेतून निवडून आणले. महाराष्ट्रात एम. आय. डी. सी. ची निर्मिती म्हणजे उद्योगाचे विकेंद्रीकरण पहिल्याप्रथम झाले. देशातील जिल्हा परिषदेची पहिली निर्मिती महाराष्ट्रात झाली. ‘रोजगार हमी’चा कायदा महाराष्ट्रात झाला. देशाने तो ‘न.रे.गा.’ योजना म्हणून स्वीकारला. वसंतराव नाईक यांनी चार कृषीविद्यापीठांची निर्मिती केली. कापूस एकािधकार धोरण आणून यशवंतराव मोहिते यांनी विदर्भातील शेतकऱ्याची होणारी लुबाडणूक याच कायद्याने थांबवली. मुंबईमध्ये गृहनिर्माण मंडळ याच विधानमंडळात निर्माण झाले. मुंबईतील जुन्या चाळी दुरूस्त करून गरीब भाडेकरूला उपनगरात फेकून न देता, त्याला जागेचा मालक करण्याचे काम याच विधीमंडळाने केले. शेतकऱ्याच्या शेतातील झाडांची मालकी पूर्वी सरकारची होती. ‘ज्याच्या शेतात जी झाडं आहेत ती  मालकी त्या शेतकऱ्याची’ हा कायदा राजारामबापू पाटील यांनी याच विधानमंडळात मंजूर करून घेतला. 

याच विधानसभेत त्यावेळच्या विरोधीपक्षाने पुरोगामी कायद्यांना पाठींबा देवून रोजगार हमीसाठी प्रत्येक बस तिकीटाच्या मागे १५ पैसे कर लावायला याच सभागृहात विरोधकांनी पुढाकार घेतला. १९६० ते १९९५ पर्यंत गेल्या ३५ वर्षांत महाराष्ट्रातील ३१ मोठ्या धरणांची निर्मिती याच काळात झाली. महाराष्ट्र राज्य होण्यापूर्वी ‘कोयना’ धरण जवळपास झाले होते. त्यानंतर ‘जायकवाडी’, ‘उजनी’, ‘अप्पर वर्धा’, ‘पैनगंगा’, ‘अरुणावती’, ‘काळम्मावाडी’, ‘चांदोली’, ‘काळ’, ‘विष्णुपुरी’... ३१ नावं सांगता येतील... ३५० मध्यम धरणे झाली. चार-साडेचार हजार लघु पाटबंधारे झाले. दुसरीकडे  ‘कोराडी’, ‘चंद्रपूर’, ‘पारस’, ही औष्णिक केंद्रे िनर्माण झाली. ३५ हजार खेड्यांत वीज आली. हे सगळे विषय त्यावेळच्या विधानमंडळाने हाताळले. कुठेही पळापळ न करता, ग्रंथालयात बसून, अभ्यास करून विधेयकांना चांगल्या दुरूस्त्या सुचविल्या. सरकारने त्या स्वीकारल्या. ‘गर्भजल परिक्षा बंदी’चे विधेयक याच महाराष्ट्राच्या विधानमंडळात सुरुवातीला मृणालताईंनी आणले. सरकारने ते स्वीकारले आिण मग कायदा झाला. देशाने तो स्वीकारला... वसंतदादांनी खाजगी िशक्षणसंस्थांना उच्चशिक्षणाची सर्व व्यवस्था करायला परवानगी िदली. त्यातून आज लाखो मुले ग्रामीण भागात शिकली... डाॅक्टर, इंजिनीअर झाली... एक की दोन.... शेकडो योजना... शेकडो विषय विधानसभेत हमरी-तुमरी झाली नाही, असे नाही. १९८० नंतर आमदारांचे निलंबनही झाले. पण, विषय संपल्यानंतर सरकार आिण विरोधी पक्षाचे आमदार एकमेकांच्या खांद्यावर हात टाकून कॅन्टीनमध्ये चहा प्यायला जातात, हे महाराष्ट्रात पाहता आले... या सगळ्यापासून महाराष्ट्र आता खूप दूर गेला. महाराष्ट्राची ही शोकांतिका आहे. 

सहकारात अग्रभागी असलेला महाराष्ट्र, िशक्षणात अग्रभागी राहिलेला महाराष्ट्र, शेतीमध्ये स्वावलंबी झालेला महाराष्ट्र तो स्वावलंबी करण्यासाठी वसंतराव नाईक यांनी १२ वर्षांच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात स्वयंपूर्ण होण्याचा केलेला खटाटोप, हायब्रीडचा प्रचार हे सारे काही विलक्षण होते. शेती मोडली.... तर लोकशाही मोडेल, हा इशारा वसंतराव नाईक यांनीच ६ जून १९७१ ला िदला होता. 

एकीकडे सरकार पुरोगामी धोरणातून काम करताना सामाजिक जीवनात शैक्षणिक क्रांती करणारे कर्मवीर भाऊराव पाटील, महर्षी विठ्ठल रामजी शिंदे, धोंडो केशव कर्वे आिण मोफत िशक्षणाचा पहिला िनर्णय घेणारे बाळासाहेब देसाई... शैक्षणिक क्रांती करणारे मधुकरराव चौधरी, िशक्षणाला स्वयंपूर्ण रोजगाराची जोड देणारे शरद पवार आिण त्यांच्या खात्याच्या सचिव िचत्रा नाईक या सर्वांनी महाराष्ट्राच्या बांधणीसाठी केलेले कष्ट विलक्षण होते. सुखवस्तु असलेल्या वि. स. पागे साहेबांनी गरीब माणसांना १२ महिने काम िमळण्याकरिता आणलेली रोजगार हमी योजना हा महाराष्ट्राचा मानबिंदू ठरला....  महाराष्ट्राची बांधणी कोणी, कशी केली? हे महाराष्ट्राला समजावे, म्हणूनहा तपशिल सांगत आहे.  

एकीकडे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, दुसरीकडे संत गाडगेबाबा, तुकडोजी महाराज, कामगारांमध्ये डांगे, समाजवादी नेते एस. एम., फार न शिकलेला महाराष्ट्राचा शहाणा माणूस वसंतदादा पाटील, वाळव्याचे राजारामबापू पाटील, रेठऱ्याचे यशवंतराव मोहिते, नवीन औरंगाबाद वसवणारे रफीक झकेरिया, महिलांच्ो लढे लढविणाऱ्या मृणालताई आिण अहिल्यात्याई, तारा रड्डी, संगमनेरचे भाऊसाहेब थोरात, सांगोल्याचे गणपतराव देशमुख, यवतमाळचे जांबुवंतराव, यवतमाळमधून ‘लोकमत’ हे साप्ताहिक सुरू करून पुरोगामी विचार महाराष्ट्रात अग्रेसरपणे मांडणारे आिण अापले दैनिक सर्वाधिक खपाचे करणारे बाबूजी, शेगावचा देवमाणूस शिवशंकरभाऊ, महाराष्ट्र राज्य िनर्माण करणारे, आचार्य अत्रे, डांगे, एस. एम., प्रबोधनकार ठाकरे, क्रांतीसिह नाना पाटील, उद्धवराव पाटील हे सारे नेते आज आठवत आहेत. त्यावेळची विधानसभा आठवते... त्यावेळच्या चर्चा आठवतात... आजच्ाा महाराष्ट्र पाहताना या नेत्यांना िकती क्लेष होत असेल, ‘याचसाठी का केला होता अट्टाहास’ अशी अपराधी भावना ते स्वर्गात व्यक्त करत असतील.... 

महाराष्ट्रात जे काही घडले आहे, घडते आहे, उद्या घडणार आहे, त्याला जबाबदार कोण? याची चर्चाच आता करत बसू नका.... त्याचा काही फायदा होणार नाही. सत्ता आिण पैसा याभोवती फिरत असलेल्या महाराष्ट्रातील या गलिच्छ राजकारणाने महाराष्ट्राच्या पुरोगामी विचाराला कधीच मूठमाती िदली. त्यामुळे उद्याचा महाराष्ट्र हा िबहारच्या पुढे निघून गेला.... तर त्याची खंत करण्याचीही आता कोणाला गरज वाटणार नाही... दु:ख याचेच वाटते की, या सगळ्या घाणीमध्ये महाराष्ट्राच्या काँग्रेसने सामीलच व्हायला नको होते. ज्या महाराष्ट्र काँग्रेसने या सगळ्या पुरोगामी कायद्यांचा पक्षाच्या बैठकीत आग्रह धरून, ते कायदे सरकारला करायला लावले, ती महाराष्ट्र काँग्रेस आज कुठे आहे?  ते यशवंतराव, ते वसंतदादा, ते वसंतराव नाईक, शंकरराव चव्हाण आिण अगदी विलासरावांपर्यंत ते नेतृत्त्व कुठे? तो विचार कुठे? आिण आजचा महाराष्ट्र कुठे? १९६२ च्या लोकसभा िनवडणुकीत सोलापूरचे तुळशीदासदादा जाधव यांना मतदारसंघ द्यायचा राहिला. 

ते उठून म्हणाले, ‘यशवंतरावसाहेब, माझे काय?’.... यशवंतराव हसले... आिण म्हणाले... ‘अरे, हो की.... नांदेडला उभे राहता का?’ तुळशीदासदादा ‘हो’म्हणाले. आिण सोलापूरचे तुळशीदासदादा नांदेडहून दीड लाख मतांनी निवडून आले. २००९ साली कोल्हापूरच्या जयंत आवळे यांना विलासराव देशमुख यांनी लातूरमधून तेवढ्याच मतांनी िनवडून आणले. हे घडू शकले.... कारण त्यावेळी जनतेचा नेत्यांवर विश्वास होता. अाज हा विश्वासच उडाला. िशवाय आमची महाराष्ट्र काँग्रेस सत्तेसाठी लाचार झाली. विधानसभेचे अध्यक्षपद, काँग्रेसला िमळालं होतं. नाना पटोले यांनी राजीनामा दिल्यानंतर काँग्रेसने ठाम भूमिका घ्यायला हवी होती... ‘आमच्या पक्षातर्फे हा अध्यक्षपदाचा उमेदवार आहे. 

हवा तर स्वीकारा... नाहीतर आम्ही सरकारमधून बाहेर पडतो...’ हे बोलण्याची हिम्मत दाखवली असती तर आज विधानसभा अध्यक्षाविना राहिली नसती. महाराष्ट्राला लाज वाटावी, अशी स्थिती आहे. दीड वर्षे विधानसभेला उध्यक्ष नाही. आिण विधानसभेची बैठक चालू आहे.... उपाध्यक्षाला अिधकार दिले गेले. अध्यक्षािशवाय विधानसभा चालू शकते, न लिहिणाऱ्या संपादकांशिवाय जाहिरातीच्या जोरावर पेपर चालू शकतात... त्याचे महाराष्ट्राला काहीच वाटत नाही. सगळंच काही विपरित चालले आहे. काँग्रेसचे अामदार पंचतारांकित हॉटेलमध्ये ठेवावे लागतात, त्याची लाखोंची बिले कोण भरतं? का भरतं? की, बिले देतही नाहीत. तीच शक्यता जास्त आहे. याची कोणालाही लाज वाटत नाही. आमदारांचा नेत्यांवर विश्वास नाही की, नेत्यांना अमदारांची खात्री नाही? जे घडते आहे ते सगळे विपरित आहे. लाज वाटावी अशी सि्थती आहे. िबहारच्या पुढे आपण िनघून गेलो आहोत. 

   - मधुकर भावे


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.