Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सांगलीच्या प्रतापसिंह उद्यानात 1971 च्या युद्धामध्ये वापरण्यात आलेल्या युद्धटॅंक बसवण्यात येत आहे.

सांगलीच्या प्रतापसिंह उद्यानात 1971 च्या युद्धामध्ये वापरण्यात आलेल्या युद्धटॅंक बसवण्यात येत आहे.


सांगलीच्या प्रतापसिंह उद्यानात 1971 च्या युद्धामध्ये वापरण्यात आलेल्या युद्धटॅंक बसवण्यात येत आहे. याचबरोबर मनपा आयुक्त नितीन कापडणीस यांच्या प्रयत्नाने प्रतापसिंह उद्यानात शिवसृष्टी साकारत आहे. त्यामुळे  शिवश्रुष्टी बरोबर रणगाडा 

सांगलीच्या वैभवात भर घालणारा ठरणार आहे. हा रणगाडा शनिवारी प्रतापसिंह उद्यानात बसवला जाणार आहे.  सांगलीतील भकास झालेल्या प्रतापसिंह उद्यानाला उर्जितावस्था देण्याच्या दृष्टीने मनपा आयुक्त नितीन कापडणीस यांनी अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम हाती घेतले आहेत. सांगलीच्या मध्यवर्ती असणाऱ्या प्रतापसिंह उद्यानात शिवसृष्टी साकारण्याचा निर्णय आयुक्त कापडणीस यांनी घेतला तर याच ठिकाणी 1971 च्या युद्धात वापरण्यात आलेला रणगाडा बसवण्याचा निर्णयही घेतला. हा रणगाडा सांगलीत दाखल झाला असून त्याची रंगरंगोटी करून तो प्रतापसिंह उद्यानात बसवण्यात येत आहे. 

यासाठी प्रतापसिंह उद्यानात दगडी बांधकामाचा भक्कम असा कट्टा बांधण्यात आला आहे. या कट्ट्यावर शनिवार 1971 च्या युद्धातील ऐतिहासिक असा रणगाडा बसवला जाणार आहे. यासाठी सर्व तयारी पूर्ण झाली असून रणगाडा बसवल्यानंतर उर्वरित शिवसृष्टी आणि अन्य सुशोभीकरण केले जाणार आहे. आयुक्त कापडणीस यांनी प्रतापसिंह उद्यानाचे रूप पालटले असून लवकरच सांगलीचे प्रतापसिंह उद्यान आणि शिवसृष्टी पश्चिम महाराष्ट्र आणि कर्नाटकात आकर्षणाचे एक पर्यटन स्थळ बनणार आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.