Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

भारतीय ब्ल्यू पँथर ची मागणी

भारतीय ब्ल्यू पँथर ची मागणी


दलित (बौद्ध) मुलीस विष पाजून हत्याकांड घडवलेल्या गावगुंड नराधमांना कठोरातील कठोर  शिक्षा द्यावी...... भारतीय ब्ल्यू पँथर ची मागणी हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यातील महाळशी गावांमध्ये दलित (बौद्ध) समाजातील १९ वार्षिय तरूणी कु . दिक्षा हिला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर   सतत बलात्कार करून विष पाजून हत्याकांड करणाऱ्या नराधमांना कठोरातील कठोर शिक्षा देवून पिडित कुटुंबाला ताबडतोब आर्थिक मदत व नुकसान भरपाई म्हणून १ कोटी रू शासनाने दयावेत तसेच मुलिच्या कुटुंबाला सशस्त्र पोलीस बंदोबस्त मिळावा.


तसेच आरोपीस दलित प्रतिबंधात्मक कायद्यानुसार गुन्हा दाखल करून शासनाने जलदगति न्यायालयात केस चालवून आरोपीला कठोरातील कठोर शिक्षा होईल या पद्धतीने युक्तिवाद करून दिक्षा च्या पिडीत कुटुंबाला न्याय द्यावा अन्यथा संपूर्ण महाराष्ट्रराज्यभर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भारतीय ब्ल्यू पँथर तिव्र आंदोलन करेल असा इशारा संस्थापक व राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गोंधळे व कार्याध्यक्ष धनंजय खांडेकर यांनी दिला.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.