राज्याला पुढील 4 दिवस पाऊस झोडपून काढणार, वाचा हवामान खात्याचा अंदाज
मुंबई : जुलै महिन्यात पावसाने संपूर्ण राज्यात जोरदार हजेरी लावली. मुंबई , ठाणे आणि पुण्यासह पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भातील सर्व जिल्ह्यांना पावसाने झोडपून काढले. या पावसाने अतिवृष्टीची नोंद होत जनजीवन विस्कळीत झाले होते. अनेक नद्यांना आणि नाल्यांना यावेळी पूर आले. महानगरांना पाणी पुरवठा करणारे तलाव तुडूंब भरुन वाहू लागले.
आता पुन्हा एकदा पावसाचे राज्यावर सावट आहे. राज्यात पुन्हा एकदा वादळी वाऱ्यासह पाऊस येण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. येत्या तीन चार दिवसांत मध्यम आणि मोठ्या प्रमाणात पाऊस होणार असल्याचा अंदाज देखील हवामान खात्याने वर्तवला आहे. काही ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस होणार असून रोजी रविवारी पावसाचा जोर वाढणार आहे.
चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांतील काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस पडणार आहे. तर विदर्भातील बाकीचे जिल्हे वाशिम, अकोला, भंडारा, नागपूर, अमरावती, वर्धा, बुलढाणा आणि यवतमाळ जिल्ह्यांत मुसळधार पावसाचा इशारा आहे. गेल्या 24 तासांत कोकण, गोवा येथे बऱ्याच ठिकाणी तर मध्य महाराष्ट्रात मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाने आपली हजेरी लावली.
आज रोजी मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, पुणे, नाशिक धुळे, नंदुरबार, चंद्रपूर, गोंदिया आणि गडचिरोली या भागांत पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर उद्या रविवारी (दि. 24) रोजी मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, पुणे, नाशिक, नंदुरबार आणि जळगाव या ठिकाणांवर पावसाचा अंदाज आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.
