Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

मित्रांसोबतची मस्ती आली अंगलट ! तरुणाचा अचानक गेला तोल; ट्रेन आली आणि..

 मित्रांसोबतची मस्ती आली अंगलट ! तरुणाचा अचानक गेला तोल; ट्रेन आली आणि..


मुंबई : कांदिवली रेल्वे स्थानकावर एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये कांदिवली रेल्वे स्थानकावर मित्रांसोबत मस्ती करणं एका मुलाला प्रचंड महागात पडलं आहे. फलटावर मित्रांसोबत मस्ती करताना या मुलाचा रेल्वे रुळावर तोल गेला आणि मागून येणाऱ्या लोकल ट्रेनची त्याला धडक लागली आणि तो ट्रेनखाली आला. हि संपूर्ण घटना कांदिवली स्टेशनवर असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. कांदिवली रेल्वे स्थानकावर घडलेली ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात रेल्वे स्थानकावर नेहमीप्रमाणे वर्दळ असल्याचं स्पष्ट दिसत आहे. या दरम्यान दोन मुलं ही फलाटावर मस्ती करतात. यापैकी एका जणाचा तोल फलाटावरुन खाली रेल्वे रुळाच्या दिशेला जातो. विशेष म्हणजे याचवेळी या मुलाच्या पाठीमागून लोकल ट्रेन येते. त्यामुळे या मुलाची रेल्वेला जोरदार धडक लागते. यावेळी मुलाच्या आजूबाजूने जाणाऱ्या प्रवाशांना मोठा धक्का बसतो. नेमकं काय घडलं ते कोणालाच समजत नाही. सर्वसामान्यपणे फलाटावर वर्दळ आहे आणि अचानक एक मुलगा मजामस्तीत फलाटाच्या खाली तोल जावून पडतो आणि नेमकं त्याचवेळी त्याच्या पाठीमागून ट्रेन येते. या मुलाला वाचवण्यासाठी मोटरमन किंवा इथर कुणाला कोणतीही संधी मिळत नाही. या घटनेप्रकरणी बोरिवली पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाला असून पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.