Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

डॉ. संजय भावे प्रदीर्घ सेवेनंतर होणार निवृत्त

डॉ. संजय भावे प्रदीर्घ सेवेनंतर होणार निवृत्तजिल्हा परिषदेकडील साथरोग वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय भावे हे दि. 31 जुलै रोजी 32 वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर निवृत्त होत आहेत. त्यांनी वैद्यकीय सेवेची सुरुवात 1990 मध्ये सांगलीतील सिव्हील हॉस्पिटल येथून केली. सिव्हील हॉस्पिटलमध्ये ते 12 वर्षे सीएमओ (कॅज्युलटी मेडिकल ऑफिसर) म्हणून कार्यरत होते. त्यांना न्यायवैद्यक प्रकरणांचा सखोल अभ्यास होता. अनेक गुंतागुंतीच्या प्रकरणांमध्ये त्यांचे बहुमोल योगदान होते. त्यांनी सहाय्यक निवासी वैद्यकीय अधिकारी म्हणून सिव्हील हॉस्पिलटमध्ये 6 वर्षे काम केले. सांगली जिल्हा कारागृहात सात वर्षे त्यांनी वैद्यकीय अधिकारी म्हणून सेवा बजावली. त्यांच्या कार्यकालात कारागृहात एकाही बंद्याचा मृत्यू झाला नाही. ठाणे येथील कारागृहातही त्यांनी एक वर्ष वैद्यकीय अधिकारी म्हणून सेवा बजावली. तेथील त्यांच्या आठवणी खूपच मजेरीस आहेत.

कराड उपजिल्हा रूग्णालयातही त्यांनी 3 वर्षे सेवा बजावली. शिवाय साथरोग वैद्यकीय अधिकारी म्हणून सांगली जिल्हापरिषदेत तीन वर्षे सेवा बजावली. त्यांच्या जिल्हा परिषदेतील तीन वर्षांच्या कारकिर्दीत 2019 ची पूर परिस्थिती उद्भवली. त्यावेळी डॉ. भावे यांच्यासह जिल्हा परिषदेच्या त्यांच्या सर्व सहकार्‍यांनी दिलेल्या योगदानामुळे पूरानंतर कोणतीही साथ उद्भवली नाही. मार्च 2020 पासून कोरोनाची महामारी सुरू झाली. त्याला तोंड देताना डॉ. भावे यांनी त्यांच्या सहकार्‍यांच्या मदतीने यांचे काम उठावदार झाले.

 एक शिस्तप्रिय, अभ्यासू, मितभाषी, सरळमार्गी वैद्यकीय अधिकारी म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. वैद्यकीय क्षेत्रातील 32 वर्षांच्या सेवेतून ते आता निवृत्त होत आहेत. या सेवाकाळात त्यांनी अनेक गरीब, गरजू रूग्णांना मोलाची मदत केली आहे. अशा या सेवावृती वैद्यकीय अधिकार्‍यास सांगली दर्पण परिवाराकडून पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.