Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

संजय राऊत यांना अखेर ईडीकडून अटक

 संजय राऊत यांना अखेर ईडीकडून अटक


शिवसेना खासदार संजय राऊत यांना अखेर ईडीने अटक केली आहे. दुपारी त्यांना अंमलबजावणी संचलनालय  ताब्यात घेतलं होतं. रविवारी सकाळीच ईडीचं पथक संजय राऊत यांच्या घरी पोहोचलं होतं. साडे नऊ तास चौकशी केल्यानंतर ईडीने संजय राऊत यांना ताब्यात घेतलं आणि त्यांना ईडी कार्यालयात घेऊन आले होते. 

संजय राऊत यांना आता सोमवारी सकाळी जे.जे रुग्णालयात तपासणीसाठी नेलं जाणार आहे. त्यानंतर त्यांना कोर्टात हजर केलं जाणार आहे. आज संजय राऊत यांच्या निवासस्थानी ईडीला 11 लाख 50 हजार रुपये मिळाल्याची देखील माहिती आहे. याआधी संजय राऊत यांना ED ने चौकशीसाठी तीन वेळा समन्स बजावला होता. मात्र ते हजर राहिले नव्हते. त्यानंतर रविवारी सकाळी ED अधिकारी थेट त्यांच्या घरी पोहोचले होते. दुपारी ताब्यात घेतल्यानंतर जवळपास 8 तासानंतर त्यांना अटक करण्यात आली आहे.

ईडीकडून केले गेलेले आरोप खोटे असल्याचं सुनिल राऊत यांनी म्हटलं आहे. आम्ही घाबरणार नाही. भाजप संजय राऊत यांना घाबरली आहे असा आरोप देखील त्यांनी केला आहे.

दुसरीकडे संजय राऊत यांच्याविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम 504, 506 आणि 509 अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. स्वप्ना पाटकर यांनी आज वाकोला पोलीस ठाण्यात जावाब नोंदवला. त्यानंतर पोलिसांनी हा एफआयआर दाखल केला. स्वप्ना पाटकर यांनी जीवे मारण्याची धमकी दिली होती अशा प्रकारची लेखी तक्रार पोलिसांना दिली होती.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.