Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

एलपीजी सिलेंडर आजपासून स्वस्त...

 एलपीजी सिलेंडर आजपासून स्वस्त...


मुंबई, 1 ऑगस्ट : महिन्याच्या पहिल्या दिवशी आज व्यावसायिक सिलेंडरच्या किमतीत कपात करण्यात आली आहे. महागाईच्या काळात सर्वसामान्यांना दिलासा देणारी ही बातमी आहे.

आजपासून व्यावसायिक सिलेडरच्या दरात 36 रुपयांनी कपात करण्यात आली आहे. आजपासून दिल्लीत 19 किलोचा व्यावसायिक सिलिंडर 2012.50 रुपयांऐवजी 1976.50 रुपयांना मिळणार आहे. तर मुंबईत 19 किलोचा व्यावसायिक सिलेंडर घेण्यासाठी आता 1936.50 रुपये मोजावे लागणार आहेत. लाईव्ह हिंदुस्थान वेबसाईटने याबाबतचं वृत्त दिलं आहे.

घरगुती सिलेंडरच्या दरात कोणताही बदल नाही मात्र, घरगुती सिलेंडरच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. मुंबई घरगुती सिलेंडरसाठी 1052 रुपये मोजावे लागणार आहेत. तर दिल्लीत घरगुती एलपीजी सिलेंडर खरेदी केल्यास तुम्हाला 1053 रुपये द्यावे लागतील. जुलैमध्येही व्यावसायिक सिलिंडरच्या दरात कपात याआधी जुलै महिन्यात व्यावसायिक सिलेंडरच्या किमतीत 8.50 रुपयांनी कपात करण्यात आली होती. त्यानंतर दिल्लीत व्यावसायिक सिलेंडरची किंमत 2012.50 रुपये, मुंबईत 1,972.50 रुपये, कोलकात्यात 2,132 रुपये आणि चेन्नईमध्ये 2,177.50 रुपये झाली होती.

त्याच वेळी, 6 जुलै रोजी घरगुती एलपीजीच्या किंमतीत 50 रुपये प्रति सिलेंडरने वाढ केली होती. मे महिन्यापासून एलपीजीच्या किमतीतील ही तिसरी वाढ होती. यानंतर दिल्लीत अनुदानाशिवाय 14.2 किलोग्रॅमच्या एलपीजी सिलिंडरची किंमत आता 1,003 रुपयांवरून 1,053 रुपये झाली आहे. यापूर्वी 7 मे रोजी सिलेंडरमागे 50 रुपयांची वाढ करण्यात आली होती. याआधी 22 मार्चलाही प्रति सिलेंडरच्या दरात वाढ करण्यात आली होती.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.