Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

शिवसेनेचा मुख्यमंत्री पुन्हा होईल - उद्धव ठाकरे

शिवसेनेचा मुख्यमंत्री पुन्हा होईल - उद्धव ठाकरे


मुंबई :  शिवसेनेचा मुख्यमंत्री पुन्हा होईल, असा विश्वास माजी मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केलाय. विधानसभा निवडणुका होऊ द्या, मग दाखवतोच, असे आव्हान त्यांनी दिले.

मुंबई महापालिकेवरही शिवसेनेचाच भगवा फडकेल, असंही त्यांनी म्हटले आहे. देशात ईडी सीबीआयचा गैरवापर केला जातोय असा आरोप त्यांनी केला. विरोधकांनी एकत्र येत पदाची लालसा न ठेवता लढलं पाहीजे ,अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. 'सामना'ला दिलेल्या मुलाखतीत उद्धव ठाकरे यांनी भाजप आणि शिंदे गटावर पुन्हा एकदा कडाडून हल्लाबोल केला आहे. ही मुलाखत संजय राऊत यांनी घेतली.

उद्धव ठाकरे यांनी अत्यंत व्यथित होत म्हणाले, ज्यांना मी आपले मानले, तीच माणसं सोडून गेली. म्हणजेच ती माणसं कधीच आपली नव्हती. त्यांच्याबद्दल वाईट वाटण्याचे कारण नाही. भाजपमध्ये आज बाहेरून आलेल्यांनाच सर्वकाही दिलं जात आहे. मुख्यमंत्रीपदापासून विरोधी पक्षनेते पदापर्यंत. त्याचबरोबर त्यांनी स्पष्टच सांगितले, महाविकास आघाडीचा प्रयोग चुकला नाही. लोकांनी स्वागतच केले. 'वर्षा' सोडून जाताना महाराष्ट्रात अनेकांनी अश्रू ढाळले. कोणत्या मुख्यमंत्र्यांना असे प्रेम मिळाले? त्या अश्रूंचे मोल मी वाया जाऊ देणार नाही!

हीच तर लोकशाहीची वेगळी गंमत

विरोधी पक्षाची भीती सत्ताधाऱ्यांना वाटायला लागली असेल तर तो त्यांचा कमकुवतपणाच म्हणावा लागेल. लोकशाहीचा अर्थ असा नाही की, प्रत्येक वेळी विजय मिळेल. शिवसेना, काँग्रेस, भाजप कुठलाही पक्ष असो, त्यांना सातत्याने विजय प्राप्त होत नसतात. जय-पराजय सगळ्यांचेच होत असतात. नवीन पक्ष उदयाला येत असतात. तेही काही काळ चमकून जातात. हीच तर लोकशाहीची वेगळी गंमत आहे.

का तर म्हणे हिंदुत्व, भाजपवाल्यांनो सावधान!

झालो मी मुख्यमंत्री. कारण मी आता होऊन गेलेलो आहे. काय प्रॉब्लेम काय तुम्हाला? म्हणून काय तुम्ही ज्या बाळासाहेबांचा फोटो लावता, त्या बाळासाहेबांच्या पुत्राला मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीतून खाली उतरवले? का तर म्हणे हिंदुत्व वगैरे, काँग्रेस-राष्ट्रवादी नको. ठीक आहे, पण आजच्या मुख्यमंत्र्यांची भरसभेतही नाटके पाहा. भाजप किती भयंकर म्हणून त्यांनी भरसभेत मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. ती क्लिप फिरतेय. भाजप कसा शिवसैनिकांवर अन्याय-अत्याचार करतो ही ती क्लिप आहे. माझ्याच समोर त्यांनी तो राजीनामा दिला होता. उद्धव ठाकरे म्हणाले, प्रत्येकाच्या पापाचा घडा भरत असतो. उद्या हे महाशय स्वत:ला नरेंद्रभाई मोदी समजतील आणि पंतप्रधानपदावर दावा सांगतील. भाजपवाल्यांनो, सावधान!

लोकशाही राहील की नाही ?

देशातील आताची परिस्थिती अगदी तशीच आहे. मात्र विरोधी पक्षाची भीती सत्ताधाऱ्यांना वाटायला लागली असेल तर तो त्यांचा कमकुवतपणाच म्हणावा लागेल. लोकशाहीचा अर्थ असा नाही की, प्रत्येक वेळी विजय मिळेल. शिवसेना, काँग्रेस, भाजप कुठलाही पक्ष असो, त्यांना सातत्याने विजय प्राप्त होत नसतात. जय-पराजय सगळ्यांचेच होत असतात. नवीन पक्ष उदयाला येत असतात. तेही काही काळ चमकून जातात. हीच तर लोकशाहीची वेगळी गंमत आहे.

मग भीती कसली त्यात?

पण सर्वकाही तुमच्या बुडाखाली ठेवायचे अशी राक्षसी महत्त्वाकांक्षा येते, तेव्हा मात्र त्यांना विरोधी पक्षाची भीती वाटायला लागते. मीही मुख्यमंत्री होतो. आज नाहीय, पण तुमच्यासमोर पहिल्यासारखा बसलोय. काय, फरक काय पडला? सत्ता येते आणि जाते. मग सत्ता परत येते. माझ्यासाठी म्हणाल तर, सत्ता असली काय आणि नसली काय, काहीच फरक पडत नाही. अटलबिहारी वाजपेयीजी एकदा बोलले होते, 'सत्ता आती है, जाती है. लेकीन देश रहना चाहिये.' देश राहण्यासाठी सगळ्या पक्षांनी मिळून काम नाही केले तर आपणच आपल्या देशाचे शत्रू आहोत. कारण देशाला आजसुद्धा अनेक प्रश्न भेडसावताहेत. सध्या रुपयाने नीचांक आणि महागाईने उच्चांक गाठलाय. बेरोजगारी आहे. अशा सगळय़ा गोष्टींकडे कुणाचे लक्ष नाही. थातूरमातूर मलमपट्टी केली जाते, असे उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.