अनिकेतचा मृतदेह नेलेली गाडी पंचांनी ओळखली
अनिकेत कोथळे खून खटल्याच्या सुनावणीत ज्या कार मधून अनिकेत कोथळेचा मृतदेह आंबोली घाटात नेण्यात आला ती कार आज साक्षीच्या वेळी पंच राहुल अभुमुंडें यांनी ओळखली. सांगली जिल्हा न्यायालयात जिल्हा न्यायाधीश आर.के.मलाबादे यांच्या समोर सध्या अनिकेत कोथळे खून खटल्याची सुनावणी सुरू आहे. यात सरकार पक्षातर्फे विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम हे काम पहात आहेत.
अनिकेत कोथळे खून खटल्यात सांगली शहर पोलीस ठाण्यातील घटनेच्या वेळी असलेल्या ज्या नोंदी होत्या ते रेकॉर्ड , अटक रजिस्टर , स्टेशन डायरी आदी गोष्टी सीआयडीचे जेव्हा जप्त केल्या तसेच दुसरा पंचनामा ज्या कार मधून अनिकेतचा मृतदेह आंबोली घाटात नेण्यात आला त्या कारच्या पंचनाम्यावेळी उपस्थित असलेले पंच महापालिकेचे घरपट्टी विभागातील लिपिक राहुल अभुमुंडे यांची न्यायालयात साक्ष झाली.
यावेळी अभुमुंडे यांनी पंचनाम्यावेळी जप्त केलेले रेकॉर्ड त्यावरील सह्या , अटक रजिस्टर , स्टेशन डायरी त्यांच्या समोर जप्त केल्याचे सांगून त्यावरील सह्या ओळखल्या. तसेच साक्ष झाली. तसेच ज्या कार मधून अनिकेतचा मृतदेह आंबोली घाटात नेण्यात आला ती कार सुद्धा साक्षीच्या वेळी पंच अभुमुंडे यांनी ओळखली. त्यांचा सरतपास व उलटतपास आज पूर्ण झाला. अभुमुंडे यांचा सरतपास व उलटतपास आज पूर्ण झाला. खटल्याची पुढील सुनावणी १० आणि ११ ऑगस्टला चालणार आहे. यावेळी जिल्हा सरकारी वकील अरविंद देशमुख, सीआयडीचे तत्कालीन उपअधीक्षक व तपासाधिकारी मुकुंद कुलकर्णी , सीआयडीच्या उपअधीक्षक आरिफा मुल्ला यांनी सरकार पक्षाला सहकार्य केले.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.
