Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

धक्कादायक! व्यावसायिकाने कारमध्येच स्वतःला घेतले पेटवून; पत्नी आणि मुलालाही मारण्याचा प्रयत्न

 धक्कादायक! व्यावसायिकाने कारमध्येच स्वतःला घेतले पेटवून; पत्नी आणि मुलालाही मारण्याचा प्रयत्न


नागपूर : नागपूरमध्ये एका व्यावसायिकाने स्वतःला कारमध्येच जाळून घेतल्याची धक्कादायक घटना समोर आला आहे. शहराच्या बेलतरोडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खापरी पुनर्वसन परिसरात ही घटना घडली असल्याचे सांगण्यात येत. एवढंच नाही तर त्याने स्वत:च्या पत्नी आणि मुलाला देखील जाळण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने ते त्यातून बचावले आहेत. परंतु या घटनेत व्यावसायिकाचा मात्र मृत्यू झाला. रामराज भट असे मृत व्यावसायिकाचे नाव असून आर्थिक चणचणीतून त्यांनी हे पाऊल उचलल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

रामराज भट हे पत्नी संगीता आणि मुलगा नंदन यांच्यासोबत खापरी पुनर्वसन परिसरात गेले होते. यावेळी त्यांनी कुटुंबासह सामूहिक आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. या घटनेत पत्नी आणि मुलगा जखमी झाले असून त्यांच्यावर खापरी इथल्या स्वामी विवेकानंद रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

रामराज भट यांचे नट-बोल्ट उत्पादनाचा व्यवसाय होता. विविध कंपन्यांना ते माल पुरवठा करायचे. करोना आणि लॉकडाऊनमुळे त्यांच्या व्यवसायाला प्रचंड नुकसान झाले होते. त्यामुळे भट आर्थिक अडचणीत सापडले होते. त्यांचा मुलगा नंदन इंजिनियर होता. रामराज नंदनला काम करण्याची विनंती करत होता, मात्र त्याने नकार दिला होता. त्यामुळे भट अधिकच चिंतेत होते. त्यामुळे रामराज भट यांनी सामूहिक आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला.

वर्धा मार्गावरील एका हॉटेलमध्ये जेवणाच्या बहाण्याने ते पत्नी आणि मुलाला घेऊन कारमधून निघाले. जवळपास एकच्या सुमारास खापरी पुनर्वसन केंद्राजवळ कार थांबवून भट यांनी पत्नी आणि मुलाला अॅसिडिटीच्या औषधाच्या नावावर विष पिण्यासाठी दिलं. परंतु पत्नी आणि मुलाला संशय आला. औषधाचा रंग काळा असल्याने मुलाने ते घेण्यास नकार दिला. यानंतर भट यांनी त्यांच्याजवळ असलेल्या बाटलीतील द्रवपदार्थ तिघांवरही फवारला. पत्नी आणि मुलाला काही कळण्याआधीच त्यांनी कार पेटवून दिली. यात तिघेही भाजले, ज्यात रामराज भट यांचा मृत्यू झाला.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.