Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सांगली कसिनो गॅंगवॉरचा पर्दाफाश...

सांगली कसिनो गॅंगवॉरचा पर्दाफाश...


पृथ्वीराज भैय्या पवार ‘ॲक्शन मोड’वर

भाजपचे प्रदेश सचिव पृथ्वीराज भैय्या पवार यांनी मंगळवारी दुपारी एका पत्रकार परिषदेत पोलिस, महसूल यंत्रणेला कसिनो, ऑनलाईन लॉटरी मोडून काढा अन्यथा रस्त्यावर उतरू, असा इशारा दिला होता. त्याला दोनच दिवस उलटले आहेत, आज एसएफसी मेगा मॉलच्या मागील बाजूस असलेल्या संघर्ष मार्केटमध्ये “ गोवा स्टाईल कॅसीनो “ सेंटरच्या संघर्षातून गँगवॉर झाल्याची बातमी भैय्यांपर्यंत येऊन पोहचली. (सदर मॅाल मधे २० पेक्षा जास्त कॅसिनो सरु असतात ) भैयांनी तात्काळ माहिती घेतली, व्हिडिओ, फोटो पाहिले आणि थोडा वेळ जाऊ देण्याचे ठरवले... कारण, राडा मोठा झाला होता, अनेक कॉम्प्युटर फोडले होते, एकमेकांचा बदला घ्यायला दोन्ही सेंटरचालक एकमेकांना शोधत होते आणि अशावेळी पोलिस काय भूमिका घेतात, हे पाहण्याचा निर्णय भैय्यांनी घेतला. दोनएक तासांनी पृथ्वीराजभैय्या संघर्ष मॉलमध्ये गेले, त्यांनी पाहणी केली. 

भैय्या आलेत, ही बातमी वाऱ्यासारखी पसरली. क्षणात तेथील सगळी लॉटरी सेंटर बंद करण्यात आली... भैय्या ॲक्शन मोडवर आल्याचे लोकांच्या लक्षात आले. भैय्यांनी या प्रकरणात पोलिसांची भूमिका जाणून घेण्यासाठी येथे भेट दिलेल्या पोलिस कर्मचाऱ्याला फोन केला. त्यांनी बिनदिक्कतपणे हे प्रकरण मिटवले आहे, असे सांगितले. भैय्यांनी, त्यांना आता निस्तरायला तयार राहा, असा इशारा दिला. सांगलीत नेमके काय सुरु आहे, गुंडागर्दी, तोडफोड, नशेबाजी, कॅसिनो सेंटरमध्ये लूट आणि त्यातून आज गँगवॉर झाला आहे. असे असताना पोलिस मिटवले आहे, असे म्हणतात, हे गंभीर आहे. विशेष बाब म्हणजे, हे प्रकरण अधीक्षक कार्यालयाच्या दारात झाले आहे. 

आता त्याचे सगळे व्हिडिओ थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे पाठवले जात आहेत. सांगलीच्या पोलिसिंगचा आणि इथल्या कायदा सुव्यवस्थेचा कसा बाजार मांडला आहे, याचा पंचनामा केला जाणार आहे. भैय्या आता ॲक्सन मोडवर आहेत. आप्पांनी मारुती चौकातून भल्याभल्या गुंडांना घाम फोडला होता, त्याची पुनरावृत्ती होतेय. लोकांची घरे जाळण्याचा उद्योग सांगलीत चालू देणार नाही, अशी ठाम भूमिका घेऊन भैय्या मैदानात उतरले आहेत. ‘कसिनो हटाओ, सांगली बचाओ’, हा नारा त्यांनी दिला आहे.  

SAVE YOUTH SAVE SANGLI


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.