Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सांगली जिल्ह्यात आज लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती आज मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

सांगली जिल्ह्यात आज लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती आज मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.


सांगली दिं.१: सांगली जिल्ह्यात आज लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती आज मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. येथील अण्णा लोकसेवा फाँऊडेशनच्या वतीने साहित्यरत्न लोकशाहिर अण्णाभाऊ साठे यांच्या १०२ व्या जयंतीचे औचित्य साधून शालेय मुला-मुलींना गणवेश वाटप करण्यात आले. यावेळी आण्णा लोकसेवा मंडळाचे संस्थापक अशोक मासाळे, अमर निंबाळकर, प्रफुल्ल ठोकळे,सुरज पवार, अर्जुन मजले यांच्या सह आण्णा लोकसेवा मंडळाचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

प्रारंभी अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. व अण्णाभाऊंनी साहित्य क्षेत्रात केलेल्या अमुल्य  कामगिरी बद्दल यावेळी अनेकांनी कृतज्ञता व्यक्त करुन अण्णाभाऊंना आदरांजली वाहली.शाळेच्या केंद्र प्रमुख पुजा जाधव  यांनी अण्णाभाऊंच्या आठवणी जागवत  विद्यार्थीसमोर अण्णाभाऊंचा जीवनपट मांडला.शाळेच्या मुख्याध्यापिका जयश्री यमगर  यांनी ही आपले विचार व्यक्त केले.

यावेळी  महापालिका शाळा क्रमांक ३८ मधील सर्व विद्यार्थ्यांना यावेळी मान्यवरांच्या हस्ते गणवेष वाटप करण्यात आले.  सतिश ठोकळे  राजू गस्ते, शंकर आवळे,अक्षय मासाळे व अण्णा लोकसेवा फाँऊडेशन चे कार्यकर्ते,प्रभाग क्रं-१० मधील नागरिक,पालक  उपस्थित होते. यावेळी शाळेच्या शिक्षकांनी अण्णा लोकसेवा फाँऊडेशनच्या या उपक्रमाचे कौतुक केले.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.