Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

महानगरपालिकेकडून घरपट्टी/पाणी पट्टी/ड्रेनेज तक्रार निवारण शिबिराबाचे आयोजन

महानगरपालिकेकडून घरपट्टी/पाणी पट्टी/ड्रेनेज तक्रार निवारण शिबिराबाचे आयोजन


महानगरपालिकेकडून घरपट्टी/पाणी पट्टी/ड्रेनेज तक्रार निवारण शिबिराबाचे आयोजन: नागरिकांनी सहभागी व्हावे : मनपाआयुक्त नितीन कापडणीस यांचे आवाहन


सांगली: सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेच्या घरपट्टी, पाणीपट्टी व ड्रेनेज विभागातील तक्रार यांचे निवारण करण्यासाठी सोमवार दि. ८ ऑगस्ट २०२२ रोजी पद्मभूषण डॉ. वसंतदादा पाटील सभागृह मुख्यालय सांगली येथे सकाळी ११ वाजता शिबिराच्या आयोजन केले आहे. अशी माहिती महापालिका आयुक्त नितीन कापडणीस यांनी दिली.

     या शिबिरात घरपट्टी व पाणीपट्टीच्या बिलाच्या बाबतच्या तक्रारी, कर्मचाऱ्यांनी नागरिकांकडून बिलापोटी पैसे घेतले आहेत मात्र अद्याप पावती दिलेली नाही, तसेच अर्ज देऊनही अद्याप पाणी नळ/ड्रेनेज कनेक्शन मिळाले नाही, चुकीच्या रकमेची बिले मिळाली आहेत इत्यादी प्रकारच्या घरपट्टी, पाणीपट्टी व ड्रेनेज विभागाकडील तक्रारींचे महानगरपालिकेमार्फत निवारण केले जाणार आहे तरी या शिबिराचा जास्तीत जास्त लोकांनी सहभाग लाभ घेऊन घरपट्टी, पाणीपट्टी व ड्रेनेज विभागाकडील तक्रारीचे निवारण करून घेण्याचे आवाहनही आयुक्त कापडणीस यांनी केले आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.