पत्रकार संजय काळे यांचे निधन
तासगाव, ता. ५ : तासगाव तालुक्यातील चिंचणी गावचे सुपुत्र संजय दिनकर काळे (वय वर्षे 44) यांचे अल्पशा आजाराने शुक्रवार रोजी पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास निधन झाले. तासगाव येथे महाविद्यालयीन काळापासून सांस्कृतिक, कला, सामाजिक क्षेत्रात विविध उपक्रमातून संजय काळे हे नेहमी अग्रेसर होते. तासगाव तालुका प्रतिनिधी म्हणून केसरी, जनप्रवास, महासत्ता या दैनिकातून काम केले.
तासगाव तालुका पत्रकार संघाचे बांधणीमध्ये हिरिरीने सहभाग घेऊन तालुका पत्रकार संघाचे स्थापना केली. संघाचे संस्थापक सचिव म्हणून त्यांनी अनेकअनेक वर्षे यशस्वी पत्रकारिता केली. विद्यार्थी दशेपासून कडव्या लढवय्या वृत्तीचे आक्रमक संघटन अग्रभागी होते. एस के न्यूज मराठी पोर्टल से संपादक म्हणून कार्यरत होते. सांगली जिल्हा पत्रकार कार्यकारणी मंडळाचे सदस्य होते. त्यांच्या आकस्मिक निधनाने सर्वत्र शोककळा पसरली आहे.
तासगाव, चिंचणी येथे संजय काळे यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, दोन मुली असा परिवार आहे. रक्षाविसर्जन रविवारी ७ ऑगस्ट २०२२ रोजी सकाळी ८ वाजता चिंचणी येथे होणार आहे. चिंचणी येथील कला साहित्य संस्कृती मंडळाचा अष्टपैलू कलाकार अशी त्यांची ख्याती होती. आपल्या निखळ विनोदाने ते रसिकांच्या मनात घर करून राहिले.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.
