Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव सांगलीकर करणार अविस्मरणीय,स्वातंत्र्यदिन अमृतमहोत्सव समन्वय समितीची स्थापना .

स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव सांगलीकर करणार अविस्मरणीय,स्वातंत्र्यदिन अमृतमहोत्सव समन्वय समितीची स्थापना .


सांगलीकर शहरवासीयांच्या वतीने स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव जल्लोषात साजरा करण्याचा निर्णय सांगली शहरातल्या तमाम सामाजिक संघटना,सेवाभावी संस्था यांनी घेतला असून याबैठकीत स्वातंत्र्यदिन अमृतमहोत्सव समन्वय समितीची स्थापना करण्यात आली आहे.सांगली नगरीचे प्रथम नागरिक महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांची या समन्वय समितीच्या अध्यक्षपदी एकमताने निवड करण्यात आली.

यावेळी लेझर शो,स्वातंत्र्य दिनातील योगदान असणाऱ्या शहिदांचे योगदान, सामाजिक एकात्मतेचा संदेश देणाऱ्या मशाल मार्चसह विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्याचा निर्णय एकमुखाने घेण्यात आला.यावेळी सांगली शहरातील सर्व महापुरुषांचे पुतळे सजावट व विद्युत रोषणाई करण्यासाठी आणि ध्वजारोहण समिती स्थापन करण्याचा देखील निर्णय घेण्यात आला.तमाम सांगलीकर हे 14 ऑगस्ट 2022 रात्री देशाच्या स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करायला एकाच छता खाली एकत्र येऊन तिरंग्याला अभिवादन करण्यासाठी जमा होतील अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.लवकरच समन्वय समिती बैठकीत ठरलेल्या मुद्द्यांच्यावर मंथन करून कार्यक्रमाचा मसुदा तयार केला जाणार आहे.

याबैठकीला महापौर दिग्विजय सूर्यवंशी,शरद शहा,सागर घोडके,सतिश साखळकर,विकास मगदूम,महेश पाटील,उमेश देशमुख,शाहीन शेख,राजकुमार राठोड,संजय पाटील,जगन्नाथ ठोकळे,सदाशिव मगदूम,मुस्तफा मुजावर,आनंद देसाई, प्रशांत भोसले,तोफिक शिकलगार,मयूर पाटील,युवराज शिंदे,सौरभ कदम,रवी सांगोलकर,ज्योती आदाटे,प्रियंका तुपलोंढे,महालिंग हेगडे,इत्यादी उपस्तिथ होते.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.