Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

महापालिकेकडून बुधवारी स्वराज्य सप्ताहातंर्गत समूह राष्ट्रगीत गायन

महापालिकेकडून बुधवारी स्वराज्य सप्ताहातंर्गत समूह राष्ट्रगीत गायन 


: नागरिकांनी सहभागी होणेचे महापालिका आयुक्त सुनील पवार यांचे आवाहन

सांगली : स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्त "स्वराज्य सप्ताह" अंतर्गत महानगरपालिका क्षेत्रातील सर्व नागरिक / शाळा / विद्यापीठे / महाविद्यालये / शैक्षणिक संस्था व खासगी आस्थापना यांनी बुधवार, दि. १७ ऑगस्ट, २०२२ रोजी सकाळी ११:०० वा. एकाच वेळी समूह राष्ट्रगीत गायन करण्याचे आवाहन महानगरपालिका आयुक्त सुनील पवार यांनी केले आहे. 

महानगरपालिका क्षेत्रातील सर्व नागरिक / शाळा / विद्यापीठे / महाविद्यालये / शैक्षणिक संस्था व खासगी आस्थापना यांनी बुधवार, दि. १७ ऑगस्ट, २०२२ रोजी सकाळी ११:०० ते ११:०१ या वेळेत आपण जिथे असाल त्या ठिकाणी स्तब्ध राहून समूह राष्ट्रगीत गायन करुन "स्वराज्य सप्ताह" या अभियानामध्ये सामील व्हावे असे आवाहन महापालिका आयुक्त सुनिल पवार यांनी केले आहे. दरम्यान,  समूह राष्ट्रगीत गायनावेळी जानते अजाणतेपणे राष्ट्रगीताचा अवमान होऊ नये याची दक्षता सर्वांनी घ्यावी असे आवाहनही महानगरपालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.