Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

महापालिकेकडून छ. शिवाजी महाराज स्टेडियमवर पार पडला चित्तथरारक एरो मॉडेलिंग शो

महापालिकेकडून छ. शिवाजी महाराज स्टेडियमवर पार पडला चित्तथरारक एरो मॉडेलिंग शो


महापालिकेकडून छ. शिवाजी महाराज स्टेडियमवर पार पडला चित्तथरारक एरो मॉडेलिंग शो : फोमच्या लढाऊ विमानांची प्रात्यक्षिके पाहून सांगलीकर झाले थक्क : साताराचे सदानंद काळे आणि अथर्व काळे यांनी केली प्रात्यक्षिके सादर : अनेक वर्षानंतर छत्रपती शिवाजी स्टेडियम भरले खचाखच : एरो पाहण्यासाठी हजारो सांगलीकरांची उपस्थिती


सांगली : भारत देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित आणि 75 व्या स्वातंत्र्यदिनी सांगलीतील छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमवर नेत्रदीपक आणि डोळ्याचे पारणे फेडणारा एरो मॉडेलिंग शो हजारो सांगलीकर जनतेच्या साक्षीने पार पडला. सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेकडून आयोजित  एरो मॉडेलिंग शो पाहण्यासाठी हजारो सांगलीकरांनी उपस्थिती लावली होती. यामुळे कित्येक वर्षानंतर सांगलीचे छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम फुलून गेले होते. आमदार सुधीरदादा गाडगीळ, महापौर दिग्विजय सुर्यवंशी आणि मनपा आयुक्त सुनील पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत हा नेत्रदीपक  एरो मॉडेलिंग शो संपन्न झाला. महिला बालकल्याण समिती सभापती गीतांजली ढोपे पाटील यांच्या प्रयत्नाने हा एरो मॉडेलिंग शो पार पडला.

    सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेकडून स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित आणि माझी वसुंधरा , स्वच्छ सर्व्हेक्षण, रेस टू झिरो, सेव्ह सोईल या अंतर्गत विविध उपक्रम हाती घेण्यात आले आहेत. यामध्ये तिरंगा मॅरेथॉन, स्केटींग स्पर्धा, स्वातंत्र्यसेनानी , माजी सैनिक सत्कार , विधवांना तिरंगा ध्वज वाटप, कब्बडी स्पर्धा , आरोग्य सैनिकांचा सत्कार , विद्यार्थ्यांकडून तिरंगा प्रतिकृती यासह अनेक उपक्रम पार पडले. 15 ऑगस्ट 2022 रोजीच्या स्वातंत्र्य दिनी यावेळी हजारो सांगलीकर जनतेने हा एरो मॉडेलिंग शो पाहून आपल्या डोळ्यांचे पारणे फेडले. यावेळी फोमच्या विमानांची प्रात्यक्षिके पाहून सांगलीकर थक्क झाले. यावेळी साताराचे सदानंद काळे आणि अथर्व काळे यांनी फ्लाईंग ईगल,  ग्लायडर, उडता मासा, उडती तबकडी, लोविंग ट्रेनर, दोनपंखी बायप्लेन, एरोबँटीक अल्ट्रा, सेस्ना 170-बँनर घेऊन उडणारे, हवाई पुष्पव्रुष्टी करणारे विमान, मिग-21,  जग्वार, मिराज-2000, मिग-29, तेजस, राफेल, सुखोई-30 आदी फोमपासून बनविलेली लढाऊ विमानांची यशस्वी प्रात्यक्षिके सादर केली. अनेक वर्षानंतर छत्रपती शिवाजी स्टेडियम हे नागरिकांनी खचाखच भरले होते. हा चित्तथरारक एरो मॉडेलिंग शो पाहण्यासाठी हजारो सांगलीकरांनी उपस्थिती लावली होती.


या सोहळ्यासाठी सांगलीचे आमदार सुधीरदादा गाडगीळ,  महापौर दिग्विजय सुर्यवंशी, मनपाआयुक्त सुनील पवार,  अप्पर पोलीस अधीक्षक सौ मनीषा दुबुले, पोलीस उपअधीक्षक अशोक वीरकर, महापालिकेचे स्थायी सभापती निरंजन आवटी, सभागृह नेते विनायक सिंहासने, विरोधीपक्ष नेते संजय मेंढे, महिला बालकल्याण सभापती गीतांजली ढोपे पाटील, माजी उपमहापौर आणि नगरसेवक शेखर इनामदार, धीरज सुर्यवंशी, गजानन मगदूम, प्रकाश ढंग, लक्ष्मण नवलाई, नगरसेविका सविता मदने, स्वाती शिंदे, उर्मिला बेलवलकर, अप्सरा वायदंडे, अनारकली कुरणे, सुनंदा राऊत, शुभांगी साळुंखे, मनपाचे अतिरिक्त आयुक्त चंद्रकांत खोसे, संजीव ओहोळ , आरोग्यधिकारी डॉ सुनील आंबोळे, हळद व्यापारी मनोहर सारडा, पै गौतम पवार , किरण भोसले , अश्रफ वांकर , राहुल ढोपे पाटील, याची प्रमुख उपस्थिती होती. तसेच निवृत्त लष्करी आणि सेना कर्मचारी सैनिक सुद्धा या कार्यक्रमास हजर होते. या नेत्रदीपक सोहळ्याचे नियोजन मनपाउपायुक्त राहुल रोकडे आणि उपायुक्त चंद्रकांत आडके यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक आयुक्त नितीन शिंदे , डॉ रवींद्र ताटे, महापालिकेचे ब्रँड अंबेसिडर दीपक चव्हाण , क्रीडाधिकारी महेश पाटील,  वरिष्ठ स्वच्छता निरीक्षक अविनाश पाटणकर, स्वच्छ सर्व्हेक्षणच्या समन्वयक अधिकारी वर्षाराणी चव्हाण आणि टीमने केले. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजयदादा कडणे आणि यांनी केले.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.