पोस्टच्या 'या' योजनेत फक्त 417 रुपये गुंतवाल तर करोडपती व्हाल!
मुंबई : रोज आपण इकडे तिकडे छोट्या गोष्टींवर पैसे खर्च विनाकारण करतो. हातात पैसे असले की आपल्याकडून खर्च होतात पण बचत करायची म्हटलं की टेन्शन येतं. भविष्यासाठी बचत करणं अत्यावश्यक आहे. ती नसेल तर हाल होतात याची कल्पना आपल्याला असते. त्यामुळे आपल्या बजेटमधील सेव्हिंग स्कीम आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. बचत करताना पैसे बुडणार नाहीत ना याची देखील आपल्याला चिंता असते. आज आम्ही तुम्हाला एक खास योजना सांगणार आहोत. ज्यावर तुम्ही विश्वास ठेवू शकता. तिथे गुंतवणूक केली तर तुम्हाला त्याचा मोठा फायदा होऊ शकतो. पोस्ट ऑफिसमध्ये काही खास योजना आहेत ज्यामध्ये दीर्घकाळासाठी पैसे गुंतवले तर मोठा फायदा मिळतो.
ही योजना केवळ सुरक्षितच नाहीत तर चांगले रिटर्नसही मिळवून देते. पीपीएफ (पोस्ट ऑफिस पब्लिक प्रॉव्हिडंट फंड) या योजनेत अगदी कमी रकमेतून गुंतवणूक सुरू करू शकता. ही योजना तुम्हाला मॅच्युरिटीनंतर करोडपती बनवू शकते. या योजनेत तुम्हाला दररोज 417 रुपये पीपीएफ खात्यात भरायचे आहेत. यामध्ये तुम्हाला १५ वर्षांची गुंतवणूक करावी लागेल. एकदा पैसे गुंतवले की पुन्हा ते तुम्हाला काढता येणार नाहीत. त्याला १५ वर्षांचा लॉकिंग पिरिएड असतो. १५ वर्षांनंतर तुम्ही 5-5 वर्षांनी मॅच्युरिटी लेव्हल वाढवू शकता.
तुम्हाला १० ते १५ वर्ष ते अगदी २५ वर्षांपर्यंत करता येते. गुंतवणुकीचं सोपं गणित तुम्ही या योजनेत १५ वर्ष गुंतवणूक केली. तुम्ही रोज ४१७ असे पैसे बाजूला ठेवले साधारण ते महिन्याला १२, ५०० होतील. या योजनेत तुम्ही एका वर्षाला १.५ लाखरुपयांपर्यंतचे पैसे भरू शकता. १५ वर्ष पूर्ण होईपर्यंत तुमचे पैसे या खात्यामध्ये २२.५ लाख रुपये जमा होतील. प्रत्येक वर्षाला जी रक्कम तुमच्या खात्यावर जमा झाली त्यावर ७.१ टक्के व्याज मिळणार आहे. १५ वर्षांची तुमची व्याजाची रक्कम साधारण १८ लाख रुपये होईल.
यामध्ये तुम्ही पहिल्या वर्षाला समजा १.५ रक्कम खात्यावर ठेवली. त्यावर ७.१ टक्के व्याज मिळेल. हे व्याज मिळून जी रक्कम तुमच्या खात्यात जमा होईल त्यावर दुसऱ्या वर्षी पुन्हा ७.१ टक्के व्याज मिळेल. अशी तुमच्या खात्यात १५ वर्षांची तुमची रक्कम २२.५ लाख रुपये अधिक १८ लाख रुपयांचं व्याज तुमच्या खात्यात जमा होणार आहे. तुम्हाला किती रक्कम मिळणार? एकूण रक्कम तुमच्या खात्यात ४० लाख रुपये जमा झाले. यामध्ये तुम्ही मॅच्युरिटी टेन्युअर जर ५-५ वर्ष वाढवून जर २५ वर्षांपर्यंत केलं तर तुम्ही प्रत्येक वर्षाला पुन्हा १.५ लाख रुपये तुमच्या खात्यात जमा करणार आणि या सगळ्या रकमेवर तुम्हाला ७.१ टक्के व्याज मिळणार. साधारण तुम्हाला ही योजना पूर्ण झाल्यानंतर १.०३ कोटी रुपये मिळणार आहेत.
कसं सुरू करायचं हे खातं? तुमच्या जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये जिथे तुमचं किंवा तुमच्या नातेवाईकांचं खातं आहे तिथे जाऊन या खात्यासाठी फॉर्म भरावा लागणार आहे. तुम्ही हे खातं बँकेमध्ये सुद्धा उघडू शकता. ज्या बँकेत तुमचं खातं आहे तिथे PPF खातं उघडता येतं. शक्यतो नॅशनलाइझ बँका निवडाव्यात. या खात्यामध्ये तुम्हाला कमीत कमी ५०० रुपये तरी जमा करावे लागणार आहेत. जर तुम्ही महिन्याला रक्कम चुकवली तर तुमचं खातं बंद होऊ शकतं.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.