Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

डिश टीव्ही कंपनीस आजीवन मोफत चॅनल दाखवण्याचा ग्राहक न्यायालयाचा आदेश

डिश टीव्ही  कंपनीस आजीवन मोफत चॅनल दाखवण्याचा ग्राहक न्यायालयाचा आदेश


विजय भूपाल जैन या ग्राहकास आजीवन मोफत चॅनल दाखवण्याचा आदेश डिश टीव्ही कंपनीस ग्राहक न्यायालयाच्या मुकुंद दात्ये अध्यक्ष, श्रीमती निलंबरी देशमुख व श्री अश्रफ नायकवडी यांच्या तर्फे पारित करण्यात आला. यात ग्राहकातर्फे ॲडव्होकेट धन्यकुमार धावते व ॲडव्होकेट वैभव मुकुंद केळकर यांनी काम बघितले. 

विजय भूपाल जैन यांनी डिश टीव्ही इंडिया यां कंपनीचे सेट टॉप बॉक्स खरेदी केले होते. त्यावेळी ४३ चॅनल्स आजीवन मोफत मिळतील अशी जाहिरात व पत्रक कंपनीतर्फे ग्राहकास देण्यात आली. त्यानंतर सन २०१९ मध्ये सेट टॉप बॉक्स अचानक बंद पडल्याने विजय जैन यांनी कंपनीकडे विचारणा केली. त्यावर महिना रिचार्ज केल्याशिवाय फ्री चॅनल्स दिसणार नाहीत असे कंपनी कडून सांगण्यात आले

त्यामुळे ग्राहकाने कंपनी विरुद्ध सांगली येथील ग्राहक न्यायालयात धाव घेतली. यावर दोन्ही पक्षाची बाजू ऐकून घेऊन ग्राहक आयोगाने अर्जदार ग्राहक श्री विजय जैन यांना जाहिरातीत नमूद केले प्रमाणे ४३ चॅनल आजीवन मोफत उपलब्ध करून देणेबाबत आदेश पारित केला तसेच कंपनीने यापुढे अशा फसव्या जाहिराती देऊ नयेत अशी आदेश करून शारिरीक व मानसिक त्रासापोटी तसेच अर्जाचा खर्च र. रु. ३०००/-  देण्याबाबत  कंपनीस आदेश दिला.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.