Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

जळगाव जिल्ह्यातील साखर कारखाने लवकरच होणार सुरू

जळगाव जिल्ह्यातील साखर कारखाने लवकरच होणार सुरू


जळगावकरांसाठी आनंदाची बातमी आहे. अनेक वर्षांपासून बंद असलेले सहकारी साखर कारखाने  लवकरच सुरु होणार आहेत. जिल्हा बँकेच्या सर्वसाधारण सभेत हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. जळगाव जिल्ह्यात सहकारी साखर कारखाने बंदावस्थेत आहेत. हे साखर कारखाने सुरु करण्याबाबत आता महत्त्वाचा निर्णय झालेला असून याबाबत जिल्हा बँकेच्या वतीने पाठपुरावा केला जात आहे. त्यामुळे आता अनेक दिवसांपासून बंद असलेले सारख कारखाने सुरु होणार असल्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

जिल्हा मध्यवर्ती सहकार बँकेची 106 वी सर्वसाधारण सभा शनिवारी पार पडली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे, जिल्हा बँकेचे अध्यक्ष गुलाबराव देवकर यांच्यासह संचालक यांची बैठकीला उपस्थिती होती. यावेळी जिल्हा बँकेशी संबंधित विविध विषयांवर सभेत चर्चा करण्यात आली. तसेच सहकारी साखर कारखाने सुरु करण्याबाबतचा महत्त्वाचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला आहे. ही जळगाव जिल्ह्यातील साखर उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. यामुळे जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. गेल्या अनेक वर्षांपासून जिल्ह्यातील साखर कारखाने बंद आहेत.

गेल्या काळात जिल्हा बँक ही ड वर्गात केली होती. बँकेचे एनपीए प्रचंड वाढले होते. तसेच बँकेतील ठेवींची संख्या सुद्धा मोठ्या प्रमाणावर कमी झाली होती. गेल्या दहा वर्षाच्या काळात बँकेच्या कमी झालेल्या ठेवी आता पुन्हा वाढल्या आहेत. सद्यस्थितीत जिल्हा बँकेत 3200 कोटी रुपयांच्या वर ठेवी आहेत. संचित तोटे तसेच एनपीए सुद्धा या वर्षी पाच टक्क्यांनी कमी झाला असून आता एनपीए 19 टक्क्यांपर्यंत राहिला आहे. जिल्हा बँकेचे एकंदरीत सद्यस्थिती चांगली असून सर्व सभासदांनी बँकेच्या कामकाजावर समाधान व्यक्त केल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे.

जळगाव जिल्ह्यातील सहकारी साखर कारखाने सद्यस्थितीत बंद अवस्थेत आहेत. यात चोपडा साखर कारखाना, बेलगंगा साखर कारखाना, मधुकर सहकारी साखर कारखाना यांचा समावेश आहे. विक्रीस काढलेले हे साखर कारखाने भाडेतत्त्वावर सुरू करण्याबाबतचा निर्णय झालेला आहे. तर मधुकर सहकारी साखर कारखान्याबाबतही विक्रीला प्रतिसाद मिळत नसल्याने तो भाडेकरारावर देण्याबाबतचा प्रस्ताव आला असून त्यावर सुद्धा लवकरात लवकर निर्णय .होईल त्यामुळे जिल्ह्यात बंद असलेले सर्व सहकारी साखर कारखाने लवकरच सुरू होतील आणि यासाठी प्रयत्न सुरू असल्याची माहिती एकनाथ खडसे यांनी दिली आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.