Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सांगली भाजपा शहर तर्फे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचा वाढदिवसानिमीत्त सेवा पंधरवडा अभियान अंतर्गत महारक्तदान शिबीर

सांगली भाजपा शहर तर्फे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचा वाढदिवसानिमीत्त सेवा पंधरवडा अभियान अंतर्गत महारक्तदान शिबीर


सांगली १७ सप्टेंबर २०२२ :-
भारताचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचा वाढदिवसानिमीत्त राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता असा १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोंबर पर्यंत सेवा भाजपा महाराष्ट्र सेवा पंधरवडा अभियान हा कार्यक्रम सर्वत्र राबिवण्यात येणार आहे त्या निमित्ताने भारतीय जनता पार्टी प्रभाग क्र.18 च्या वतीने शामरावनगर खिलारे मंगल कार्यालय व आमदार सुधीरदादा गाडगीळ जनसंपर्क कार्यालयात येथे महारक्तदान शिबीर घेण्यात आले असून या प्रभाग क्र.18 च्या महारक्तदान शिबिरांचे आयोजन रोहित जगदाळे सुमित शिंदे, नितीश पाटील, उमेश नरगुंदे, रोहित बाबर, दीपक जगदाळे, ओंकार जाधव, सुहास खांडेकर, राजू नलवडे, कयुंम शेख, जुनेद आवटी, गुरु सरवाड, योगेश विधानी यांनी केले आहे. 



तसेच आमदार सुधीरदादा गाडगीळ जनसंपर्क कार्यालय येथे आमदार सुधीरदादा गाडगीळ युवा मंच व भाजपा सांगली शहर जिल्हा वतीने घेण्यात आले यावेळी रक्तदान करणाऱ्या सर्वांना आमदार सुधीर दादा गाडगीळ यांच्या कडून प्रमाणपत्र देण्यात आली.. यावेळी प्रदेश कार्यकारणी सदस्य शेखर इनामदार, माजी आमदार दिनकरतात्या पाटील, भाजपा नेते सुरेश आवटी, महिला मोर्चा अध्यक्ष स्वातीताई शिंदे, युवा मोर्चा अध्यक्ष धीरज सूर्यवंशी, प्रकाश तात्या बिरजे, युवा मंचचे विश्वजीत पाटील, गटनेते विनायक सिंहासने, नगरसेवक राजेंद्र कुंभार, गजानन मगदूम, प्रकाश ढंग, गणपती साळुंखे, मोहन वाटवे, रवींद्र बाबर, कृष्णा राठोड, प्रथमेश वैद्य, अनिकेत खिलारे, हेमलता मोरे, अश्विनी तारळेकर, अमित देसाई, प्रकाश पाटील, सुहास देशमुख, अमित गडदे, आदी मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते. सेवा पंधरवड्या निमित्त भाजपा कार्यकते व पदाधिकारी यांनी विविध उपक्रम व कार्यक्रम राबविले आहेत. त्यातील महारक्तदान शिबीर हा कार्यक्रम मोठ्या उत्साहाने व आनंदात पार पडला. व यावेळी १०० पेक्षा जास्त रक्तदात्यांनी रक्तदान केले.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.