Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

मिरजमध्ये जागेचा ताबा आणि अतिक्रमण पाडण्यावरून; आमदार गोपीचंद पडळकरांच्या भावावर गाळेधारकांचा आरोप

मिरजमध्ये जागेचा ताबा आणि अतिक्रमण पाडण्यावरून; आमदार गोपीचंद पडळकरांच्या भावावर गाळेधारकांचा आरोप 


सांगलीच्या मिरजमध्ये जागेचा ताबा आणि अतिक्रमण पाडण्यावरून दोन गटात वाद झाल्याची घटना घडली. भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांचे बंधू ब्रम्हानंद पडळकर यांनी अतिक्रमण पाडल्याने वाद निर्माण झाला आहे. सदर वादग्रस्त जागेचा निकाल ब्रम्हानंद पडळकर यांच्या बाजुने लागला आहे. महापालिकेनं नोटीस दिल्यानं हे अतिक्रमण हटवल्याचा दावा ब्रम्हानंद पडळकरांनी केला आहे. अतिक्रमण हटवण्याला गाळ्यातील भाडेकरुंनी विरोध केला आहे. यावेळी दोन गटात राडा झाला. जागेचा ताबा घेण्यासाठी गाळे पाडल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.

जेसीबीने हॉटेल, दुकान गाळे जमीनदोस्त केल्यानंतर त्या गाळ्यामधील भाडेकरूंनी या घटनेला विरोध केला. जागेचा ताबा घेण्यासाठी गाळे पाडल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. ही घटना छत्रपती शिवाजी महाराज रोडवर बसस्थानकाशेजारी घडली. घटनास्थळी रात्रीपासूनच  पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. नागरिकांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू झाले आहे. 


गाळेधारक आक्रमक, जेसीबीच्या काचा फोडल्या 

जेसीबीच्या काचांची तोडफोड देखील करण्यात आली आहे. भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांचे बंधू ब्रम्हानंद पडळकरांनी ही जागा घेतल्याचा दावा केला जात आहे. या जागेचा निकाल ब्रम्हानंद पडळकर यांच्या बाजुने लागल्याचे सांगितले जात आहे. याबाबत महापालिकेने अतिक्रमण काढाची नोटीस दिली होती. त्यानंतर हे गाळे पाडण्यात आले आहेत. पाडापाडी सुरु असताना गाळेधारक मात्र चांगलेच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळालं. गाळेधारकांनी पाडापाडी करण्यास विरोध केला. यातून दोन गटात वाद झाला. यामध्ये गाळेधारकांनी जेसीबीच्या कांचा फोडल्या आहेत. सध्या काम थांबले आहे. याप्रकरणी गाळेधारक मिरज पोलिस स्थानकात तक्रार दाखल करण्यासाठी गेले आहेत. सध्या या ठिकाणी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

वाद चिघळू नये म्हणून पोलिसांचा मोठा बंदोबस्त 

वाद चिघळू नये म्हणून पोलिसांना योग्य ती खबरदारी घेतली आहे. मोठा बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आला आहे. ही घटना छत्रपती शिवाजी महाराज रोडवर बसस्थानकाशेजारी घडली आहे. मेन रोडवरचे हे गाळे पाडण्यात आले आहेत. त्यामुळं तिथे नागरिकांची मोटी गर्दी झाल्याचेही पाहायला मिळालं. दरम्यान याप्रकरणी आता नेमक्या काय बाबी समोर येणार हे पाहणं देखील महत्वाचं ठरणार आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.