"संजय राऊत एक दिवस चपलेने." ; नारायण राणे यांचा संजय राऊंतावर शाब्दिक हल्लाबोल
मुंबई: केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शिंदे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर शाब्दिक हल्लाबोल केला आहे. उद्धव ठाकरे यांची भेट घेणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं आहे. उद्धव ठाकरेंची भेट घेऊन नारायण राणे संजय राऊंताबाबत मोठा गौप्यस्फोट करणार आहे. मातोश्रीबद्दल संजय राऊत यांची भूमिका योग्य नाही, असे देखील नारायण राणे यांचं म्हणणं आहे. नारायण राणे संजय राऊतांवर शाब्दिक हल्लाबोल करत म्हणाले, "मी एक ना एक दिवस उद्धव ठाकरे यांना भेटणार आहे. मी जेव्हा खासदार झालो तेव्हा संसदेमध्ये असताना राज्यसभेत संजय राऊत माझ्या बाजूला येऊन बसायचे.
तेव्हा ते उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरेबद्दल जे काही बोलले आहे ते मी उद्धव ठाकरे यांना भेटून सांगणार आहे. ते ऐकल्यावर उद्धव ठाकरे संजय राऊत यांना चपलेने मारतील." भाजपा आमदार राम कदम यांच्याकडून भाविकांसाठी मोफत काशी यात्रा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या यात्रेच्या ट्रेनला नारायण राणे यांनी हिरवा झेंडा दाखवला आहे. यावेळी बोलताना नारायण राणे यांनी राऊतांवर शाब्दिक हल्लाबोल केला आहे. संजय राऊत मातोश्रीला संपवणार आहे. त्याचबरोबर संजय राऊत यांनी शिवसेनेला संपवण्याचा विडा उचलला आहे, असं देखील नारायण राणे यावेळी म्हणाले आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.
