Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

नथूराम गांधीजींचा राग का करायचा?

नथूराम गांधीजींचा राग का करायचा?



आज ३० जानेवारी म्हणजे महात्मा गांधीजींची पुण्यतिथी. 30 जानेवारी 1948 रोजी महात्मा गांधी यांची हत्या करण्यात आली. आजच्याच दिवशी नथुराम गोडसेनी गांधींवर गोळ्या झाडल्या होत्या. या घटनेने संपुर्ण देश हादरला होता. त्यामुळे आजचा दिवस कोणताही भारतीय विसरू शकत नाही. महात्मा गांधीजी एक सच्चे देशभक्त होते. त्यांनी त्यांचे संपुर्ण आयुष्य देशासाठी वेचले पण त्यांची हत्या करणे, या घटनेने आजही अंगावर काटा येते. पण तुम्हाला माहिती आहे का गांधींना मारणारा नथुराम गोडसे कोण होता? त्याने गांधीजींना का मारले? आणि तो गांधीजींचा एवढा राग का करायचा? आज आपण या विषयीच जाणून घेणार आहोत. 

गांधींना मारणारा नथुराम गोडसे कोण होता?

नथुराम गोडसे हा मुळचा पुणे जिल्ह्यातील बारामती गावातला. चितपावन ब्राह्मण कुटुंबात त्याचा जन्म झाला. त्याचे वडील विनायक वामनराव गोडसे हे पोस्ट खात्यामध्ये कामाला होते. मुळात नथुरामचं खरं नाव नथुराम नव्हतंच तर त्याचं खरं नाव रामचंद्र होता. त्याला सर्व प्रेमाने नथुराम म्हणायचे. नथुराम पाचवी पर्यंत गावात शिकला त्यानंतर पुढील शिक्षणासाठी त्याला पुण्यात पाठवले. तुम्हाला आश्चर्य वाटेल पण नथुरामवर लगांधी यांच्या विचारांचा प्रभाव होता. नथुराम गांधीजींना आदर्श मानायचे. १९३० दरम्यान नथुरामच्या वडिलांची रत्नागिरी येथे बदली झाली. त्यावेळी नथुरामसह त्याचे सर्व कुटूंब रत्नागिरीला आले आणि तिथे त्यांची स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्याशी भेट झाली आणि मग नथुरामच्या आयुष्याला वेगळी वळण मिळालं.

गांधीजींना मारणारा नथुराम स्वत:ला देशभक्त म्हणायचा, मग का करायचा गांधीजींचा एवढा राग?

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर नथूरामच्या आयुष्यात आले आणि नथुरामचं आयुष्यच बदललं. नथूरामला लहापणापासून सामाजिक कार्याची आवड होती त्यामुळे पूढे त्याने शिक्षण अर्धवट सोडत हिंदू महासभा तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघासाठी स्वयंसेवक म्हणून काम सुरू केले.

त्यानंतर हिंदू महासभेचे काम सुरू केल्यानंतर 'अग्रणी' या वृत्तपत्रासाठी नथुराम काम करायला लागले. पुढे या वृत्तपत्राचं नाव बदलून 'हिंदू राष्ट्र' असं ठेवण्यात आलं त्यावेळी देशभरात महात्मा गांधीजी ब्रिटिश सरकारविरोधात आंदोलन करत होते. या आंदोलनाला हिंदू महासभेचाही पाठिंबा होता.पण पुढे देशाच्या फाळणी वेळी परिस्थिती बदलली आणि हिंदू महासभेन फाळणीला विरोध दर्शवला. पुढे फाळणी झाल्यानंतर या फाळणीला महात्मा गांधी जबाबदार असल्याचं हिंदू महासभेचं म्हणणं होत. पुढे गांधीजी आणि हिंदू महासभा यांच्यातील वाद वाढत गेला. एवढेच काय तर एकेकाळी गांधीजींना आदर्श मानणारे गोडसे सुद्धा गांधीजीच्या विरोधात गेले. गांधीजी अल्पसंख्यांक म्हणजेच मुस्लिम लोकांना आनंदी ठेवण्यासाठी हिंदू कडे दुर्लक्ष करत आहे आणि भारत-पाक फाळणीला गांधीजी जबाबदार असल्याचं हिंदू महासभेचे म्हणणं होतं.

याशिवाय फाळणीमध्ये अनेक निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाला याला सुद्धा गांधीजी जबाबदार होते, असे त्यांना वाटले. म्हणूनच गोडसे हे गांधीजींच्या मागावर होते आणि त्यांनी गांधींजींना संपवण्याचा निर्णय घेतला. नेहमीप्रमाणे गांधीजी संध्याकाळच्या प्रार्थनेसाठी जात असताना त्यांच्यासमोर नथुराम गोडसे आले आणि त्यांनी थेट महात्मा गांधींवर तीन गोळ्या झाडल्या. आश्चर्याची बाब म्हणजे गांधीजींवर गोळ्या झाडल्यानंतरही नथुराम तेथून पळून न जाता तिथेच थांबले आणि स्वतःला पोलिसांच्या स्वाधीन केले. या हत्याकांडात फक्त गोडसेच नव्हते तर त्यांच्यासोबत सहा जण होते.

गांधीजींच्या मृत्यूनंतर देश हादरुन गेला होता. गोडसे हे हिंदू महासभा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक होते म्हणून गांधीजींच्या मृत्यूनंतर हिंदू महासभा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्यावर बंदी घालण्यात आली. मात्र महात्मा गांधी यांच्या हत्येशी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा म्हणजेच आरएसएसचा काहीही संबंध नव्हता, ही गोष्ट जेव्हा सिद्ध झाली तेव्हा त्या वेळचे पंतप्रधान पंडित नेहरू आणि उपपंतप्रधान सरदार वल्लभभाई पटेल यांनी आरएसएस संघावरील निर्बंध मागे घेतले.




➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.