Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

चार वर्षापासून पगार थकला, पीएसआयने केली आत्महत्या

चार वर्षापासून पगार थकला, पीएसआयने केली आत्महत्या


मुंबई : चार वर्षांपासून पगार थकल्यामुळे एका पोलिस उपनिरीक्षकाने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. प्रकाश काशिनाथ थेतले असे आत्महत्या केलेल्या उपनिरीक्षकाचे नाव आहे. या प्रकरणी प्राथमिक अहवालावरून गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू असल्याचे सांगण्यात आले.

प्रकाश थेतले मुंबईतील चुनाभट्टी भागात राहात होते. त्यांना गेल्या चार वर्षांपासून पगार मिळत नव्हता. ते नवी मुंबईतील कोपरखैरणे पोलिस ठाण्यात कार्यरत होते. पण काही महिन्यांपूर्वी मुंबईत बदलीवर आले होते. गेल्या अनेक महिन्यांपासून ते टीबीच्या आजाराने त्रस्त होते. उपचारासाठी पैसे जमा करण्यात अपयश आल्यामुळे त्यांनी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी प्रकाश काशीराम यांनी त्यांच्या कुटुंबीयांना काळजी घ्या असा मेसेज पाठवला आणि नंतर आपले जीवन संपवले. दरम्यान, या घटनेने खळबळ उडाली असून घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन मुंबई पोलिसांनी याबाबत अधिक तपास सुरू केला आहे.

प्रकाश काशिनाथ थेतले (वय 38 ) यांचा मागील चार वर्षांपासून पगार बंद होता. मे 2022 पासून त्यांना टीबी आजाराने ग्रासले होते. त्यामुळे त्यांच्यावर उपचार सुरू होते. थेतले यांना दारूचे व्यसन होते. शिवाय ते नेहमी गैरहजर राहत होते. कोपरखैरणे पोलिस ठाण्यातून 29 नोव्हेंबर 2022 रोजी बदलीवर मुंबई शहर येथे बदलून आले होते. 29 जानेवारी रोजी रात्री चुनाभट्टी येथील त्यांच्या राहत्या घरी असताना कुटुंबियांना take care असा मेसेज करून गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. आत्महत्येपूर्वी त्यांनी एक चिठ्ठी देखील लिहिली होती. यात कामात वरिष्ठांचे सहकार्य लाभले असा उल्लेख असल्याची माहिती चुनाभट्टी पोलिसांनी दिली.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.