सांगलीत एसटी विभागाकडून सुरक्षितता मोहिमेचा शुभारंभ
या पंधरा दिवसाच्या सुरक्षितता अभियानात एसटीकडून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये एसटी कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी, नेत्र तपासणी, सुरक्षिततेबाबत विविध जनजागृती उपक्रम यांचे आयोजन करण्यात आले आहे. याचबरोबर विना अपघात सेवा सुद्धा देण्याचा मानस आहे.
या अभियानाच्या शुभारंभप्रसंगी आगार व्यवस्थापक धनाजीराव घाटगे, विभागीय वाहतूक अधिकारी वृषाली भोसले, कामगार अधिकारी, विभागीय कर्मचारी वर्ग अधिकारी प्रवीण पाटील, विभागीय वाहतूक अधीक्षक विजय मोरे, लेखाधिकारी मानिनी तेलवेकर, विभागीय सांख्यिकी अधिकारी अनिल पार्टे, सहायक वाहतूक अधीक्षक विक्रम हांडे, सहाय्यक वाहतूक अधीक्षक शीतल माने, सहाय्यक कार्यशाळा अधीक्षक प्रवीण कोळी यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.
.jpeg)
